मराठी बातम्या /बातम्या /मनी /मोठी बातमी! सलग 5 तासांहून अधिक वेळ काम करता? 1 एप्रिलपासून मोदी सरकार नियमांमध्ये करणार बदल

मोठी बातमी! सलग 5 तासांहून अधिक वेळ काम करता? 1 एप्रिलपासून मोदी सरकार नियमांमध्ये करणार बदल

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

कामांच्या तासांबरोबरच पीएफ व निवृत्ती वेतनातही बदल होणार आहे

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : 1 एप्रिल 2021 पासून तुमची ग्रॅच्युटी, पीएफ आणि कामाच्या तासांमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी आणि भविष्य निधीत (पीएफ) वाढ होणार असून हातात येणाऱ्या रकमेत घट होऊ शकते. (टेक होम सॅलरी) इतकच नाही तर कंपनीच्या बॅलेन्स शीटवरही याचा प्रभाव पाहायला मिळेल. या कारणामुळे गेल्या वर्षी संसदेत पास करण्यात आलेले तीन मजूर संहिता विधेयक (कोड ऑन वेजेज बिल) या वर्षी 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. (Employees will not work for more than 5 hours )

ही विधेयके या वर्षी 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता

मजुराच्या नव्या व्याख्येनुसार त्यांचा भत्ता एकूण पगाराच्या अधिकतर 50 टक्के असेल. याचा अर्थ असा की मूळ पगार एप्रिलपासून एकूण पगाराच्या 50 टक्के अधिक असावा लागेल. देशाच्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारे कायद्यात बदल करण्यात येत आहे. सरकारचा दावा आहे की, नियोक्ता आणि श्रमिक दोघांसाठी हे फायदेशीर आहे.

हे ही वाचा-विमा कंपनीला घडवली अद्दल; 2.53 कोटींसाठी 21 वर्षे लढत होता एक मुंबईकर, अखेर...

कामाच्या तासात बदल

नवीन ड्राफ्ट कायद्यात कामाचे अधिकतर तासांमध्ये वाढ करुन 12 पर्यंत आणण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ओएसएच कोडच्या ड्राफ्ट नियमांमध्ये 15 ते 30 मिनिटांमधील अतिरिक्त कामही 30 मिनिटांपर्यंत मोजून ओव्हरटाइममध्ये सामील करण्याचा पर्याय आहे. सध्याच्या नियमांमध्ये 30 मिनिटांपेक्षा कमी वेळाचा ओव्हरटाइम ग्राह्य धरला जात नाही. (Employees will not work for more than 5 hours ) ड्राफ्टच्या नियमांमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याकडून 5 तासांपेक्षा जास्त सतत काम करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येक पाच तासांनंतर अर्ध्या तासाचा ब्रेक देण्याचे निर्देश ड्राफ्ट नियमांमध्ये सामील आहेत.

म्हणून वेतनात घट आणि पीएफमध्ये वाढ

नवीन ड्राफ्टच्या नियमांनुसार मूळ वेतन एकूण वेतनाचा 50 टक्के वा अधिक असायला हवा. ज्यामुळे अधिकतर कर्मचाऱ्यांची वेतन संरचनेत बदल होईल. कारण वेतनाचा गैर भत्त्याचा भाग सर्वसाधारणपणे एकूण पगाराच्या 50 टक्क्यांहून कमी असतो. तर एकूण वेतनात भत्त्याचा हिस्सा अधिक वाढतो. मूळ वेतन वाढल्याने तुमचा पीएफदेखील वाढेल. पीएफ मूळ वेतनावर अवलंबून असतो. मूळ वेतन वाढल्याने पीएफ वाढेल, याचा अर्थ टेक-होम वा हातात येणाऱ्या पगारात घट होईल.

निवृत्तीवेतनात होईल वाढ

ग्रॅच्युटी आणि पीएफमध्ये वाढ झाल्याने रिटायरमेंटनंतर मिळाणाऱ्या रकमेत वाढ होईल. यामुळे लोकांना निवृत्तीनंतर सुखी जीवन जगणं सोपं जाईल. जास्त पगाराची रक्कम असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनात सर्वाधिक बदल होईल आणि यामुळे त्याच्यावर याचा जास्त परिणाम पाहायला मिळेल. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढल्याने कंपनीला फायदा होऊल. कारण त्यांनाही कर्मचाऱ्यांसाठी पीएफमध्ये जास्त योगदान द्यावं लागेल. परिणामी कंपन्यांच्या बॅलेन्स शीलटवर परिणाम होईल.

First published:

Tags: Job, Narendra modi, Salary