Home /News /money /

FD मधील पैसेही होणार कमी! महागाई तुमच्या खिशावर कशी मारतेय डल्ला? घरचं बजेट आता नव्याने करावं लागणार

FD मधील पैसेही होणार कमी! महागाई तुमच्या खिशावर कशी मारतेय डल्ला? घरचं बजेट आता नव्याने करावं लागणार

Inflation : वाढत्या महागाईचा लोकांच्या उत्पन्नावर, आर्थिक विकासावर आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. याचा नकारात्मक परिणाम असा होईल की महागड्या किंमतीमुळे लोक खरेदी देखील थांबवू शकतात.

    मुंबई, 13 मे : दिवसेंदिवस वाढणारी महागाई सर्वसामान्यांचे जगणे अवघड करत आहे. खाद्यपदार्थ, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol-diesel price hike) झालेल्या वाढीमुळे किरकोळ महागाईचा (Retail Inflation) दर मार्च महिन्यात 6.95 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या 18 महिन्यांतील उच्चांक आहे. हीच स्थिती घाऊक किमतीवर आधारित महागाई दराची आहे जी मार्चमध्ये 14.55 टक्के होती. गेल्या 12 महिन्यांपासून घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर दुहेरी आकड्याच्या वर राहिला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो दर (RBI Repo rate) वाढवला आहे. त्यामुळे आता महागाई आणखी वाढणार आहे. ही महागाई फक्त सामान्य माणसावरच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम करत आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. महागाई आरबीआयच्या मर्यादेपेक्षा जास्त आरबीआय किरकोळ चलनवाढीचा दर आधार मानते आणि किरकोळ महागाई दर 6.95 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो आरबीआयच्या 6 टक्क्यांच्या वरच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. महागाईतून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. नुकत्याच सादर केलेल्या पतधोरण आढाव्यादरम्यान, आरबीआयने 2022-23 साठी 5.7 टक्के महागाई दराचा अंदाज वर्तवला आहे. तर 2021-22 मध्ये RBI ने महागाई दर 4.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु, दीर्घकाळ खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धातून पुरवठा साखळीतील समस्या यामुळे पेट्रोल, डिझेल ते नैसर्गिक वायूसह अनेक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे, त्यामुळे महागाई वाढली आहे. IPL प्रसारण हक्क खरेदी करण्याच्या शर्यतीमध्ये Google ची एन्ट्री! महागाईचा खिशावर डल्ला महागड्या इंधनामुळे लोकांना गाडीत पेट्रोल डिझेल घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. सीएनजीपासून ते स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत पीएनजीच्या किमती गेल्या सहा महिन्यांत 50 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. खाद्यतेल विशेषत: मोहरीचे तेल आजही 200 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. गव्हाच्या दरात वाढ झाल्याने पीठही महाग होत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे एफएमसीजी कंपन्यांनी साबण, डिटर्जंट आणि शाम्पूच्या किमती वाढवल्या आहेत, तर ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे एसी, रेफ्रिजरेटरपर्यंतच्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. ऑटोमोबाईल कंपन्यांनीही यामुळे कार, एसयूव्ही आणि दुचाकींच्या किमती वाढवल्या आहेत. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, जेवढी किंमत वाढली आहे तेवढी वाढ केली नाही. याचा अर्थ कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम होत आहे. जर त्यांना कमी नफा असेल तर ते नवीन गुंतवणूक करणार नाहीत तसेच कर्मचार्‍यांच्या पगारात वाढही कमी होईल. याचा अर्थ वाढत्या महागाईचा लोकांच्या उत्पन्नावर, आर्थिक विकासावर आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. याचा नकारात्मक परिणाम असा होईल की महागड्या किमतीमुळे लोक या वस्तूंची खरेदीही थांबवू शकतात. महागाईचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होतो? या महागाईच्या काळात समजा एखाद्याचा पगार वाढला तरी त्याला आनंद होण्याचे कारण नाही. कारण वाढलेले अतिरिक्त उत्पन्न महागाईने गिळंकृत केले आहे. आणि ज्यांचे उत्पन्न वाढले नाही त्यांना ती वस्तू विकत घेण्यासाठी एकतर बचतीतून पैसे काढून पैसे खर्च करावे लागेल किंवा तो पूर्वी जे प्रमाणात वापरत असे, ते आता कमी होत आहे. तुम्ही बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करता. भारतातील सामान्य लोकांसाठी गुंतवणुकीचा हा एक चांगला मार्ग आहे. बर्‍याच वेळा जास्त महागाई दरामुळे अशी परिस्थिती येते की एफडीमध्ये ठेवलेले पैसे वाढण्याऐवजी कमी होतात. महागाई अतिशय हुशारीने तुमच्या बचतीवर परिणाम करते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 1000 रुपयांच्या बचतीवर 5 टक्के व्याज मिळत असेल. परंतु, किरकोळ चलनवाढीचा दर 7 टक्के असेल, तर तुम्हाला एका वर्षानंतर 1050 रुपये मिळतील. मात्र, महागाईमुळे तुम्हाला 1070 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच तीच वस्तू खरेदी करण्यासाठी 20 रुपये खिशातून खर्च करावे लागतील. जे तुम्हाला इतर बचतीच्या माध्यमातून टाकावे लागतील. Gold Price Today:लग्नसराईच्या दिवसात आज पुन्हा महागलं सोनं,तपासा 10 ग्रॅमचा भाव महागाईमुळे क्रयशक्ती कमी होते वाढत्या महागाईमुळे लोकांची क्रयशक्ती कमी होत आहे. महागाईच्या काळात उत्पन्न जास्त असले तरी ते वास्तवात नाही. महागाई वाढल्याने खरेदी क्षमता कमी होते. कारण तीच वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. इतर अनावश्यक खर्चात कपात करावी लागेल. बचत करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे बचत योजनांवर परिणाम होतो आणि व्यक्ती कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकत नाही. महागाईमुळे कर्ज महाग होत आहे किरकोळ महागाई 6.95 टक्क्यांवर पोहोचली आहे. जी आरबीआयने निश्चित केलेल्या 6 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्या प्रकारे महागाई वाढत आहे, त्यानंतर व्याजदर महाग होऊ लागले आहेत. एसबीआयपासून ते अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँकेपर्यंत कर्जे महाग झाली आहेत. म्हणजेच जे ईएमआय भरत आहेत त्यांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. Mumbai Local AC Train:एसी लोकलच भाडं कमी केल्यानंतर रेल्वेचा आणखी एक मोठा निर्णय रेपो दरामुळे आता महागाई आणखी वाढणार महागाईने एप्रिलमध्ये 8 वर्षांचा विक्रम मोडला असून व्याजदरात आणखी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या ताज्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर (CPI) ज्या प्रकारे 7.79 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तो किमती वाढण्याची व्याप्ती वाढवण्याचा परिणाम आहे. एजन्सीचा अंदाज आहे की सध्याच्या परिस्थितीत, रिझर्व्ह बँक (RBI) चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये व्याजदर आणखी एक टक्क्याने वाढवू शकते. CRISIL चा अंदाज आहे की संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 साठी देशातील सरासरी किरकोळ महागाई दर 6.3 टक्के असण्याची शक्यता आहे, जो रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्क्यांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत 2021-22 या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5.5 टक्के आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Inflation, Rbi, Rbi latest news

    पुढील बातम्या