Home /News /money /

Gold Price Today : लग्नसराईच्या दिवसांत आज पुन्हा महागलं सोनं, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

Gold Price Today : लग्नसराईच्या दिवसांत आज पुन्हा महागलं सोनं, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

Gold Price Today, 12 May 2022: गुरुवारी सोने - चांदी दरात बदल झाले. मागणी वाढल्याने सोने दरात वाढ झाली आहे, तर चांदीचा दर कमी झाला आहे.

    नवी दिल्ली, 12 मे : ग्लोबल मार्केटमध्ये चढ-उताराचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळतो आहे. गुरुवारी सोने - चांदी दरातही बदल झाले. मागणी वाढल्याने सोने दरात वाढ (Gold Price Today) झाली आहे, तर चांदीचा दर कमी (Silver Price Today) झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 25 रुपयांनी वाढला. या वाढीनंतर सोने दर 50,848 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. याआधी सोनं ट्रेडिंच्या सुरुवातीला 50,939 रुपये लेवलवर होतं. परंतु खरेदीदार आणि मागणी कमी झाल्याने याची किंमत 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 50,848 वर पोहोचली. चांदीच्या दरात घसरण - MCX वर सकाळी चांदीचा रेट कमी झाला. सकाळी चांदीचा दर 351 रुपयांनी घसरुन 60,401 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. याआधी चांदी ट्रेडिंगच्या सुरुवातीला 60,550 रुपये प्रति किलोग्रॅम होती. परंतु त्यानंतर यात 0.58 टक्क्यांची घसरण होऊन दर 60,401 रुपयांवर आला. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंटने वाढ केल्यानंतर गुंतवणूकदार नाराज झाले आहेत. फेड रिझर्व्हने व्याजदर आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच महागाईचा दरही सातत्याने वाढत आहे, ज्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत असून जगभरातील इक्विटी मार्केटमध्ये सुधारणा दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आपला पैसा बाजारातून बाहेर काढून सोन्यासारख्या स्थिर आणि टिकाऊ गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवत आहेत. लग्नसराईचा हंगाम असल्याने त्याची मागणीही वाढत असून दरही वाढू लागले आहेत.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver prices today

    पुढील बातम्या