Home /News /mumbai /

Mumbai Local AC Train: एसी लोकलचं भाडं कमी केल्यानंतर रेल्वेचा आणखी एक मोठा निर्णय, असा होणार फायदा

Mumbai Local AC Train: एसी लोकलचं भाडं कमी केल्यानंतर रेल्वेचा आणखी एक मोठा निर्णय, असा होणार फायदा

Mumbai AC Local Train: 5 मेपासून भाडं कमी केल्यानंतर एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. तसंच मेन लाइन CSMT-कल्याण-टिटवाळा-अंबरनाथ दरम्यान सेवा वाढवण्याची मागणी होत आहे.

  मुंबई, 12 मे : मुंबई एसी लोकल ट्रेनच्या (Mumbai AC Local Train) सिंगल तिकीटाचं भाडं कमी केल्यानंतर रेल्वेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णायाअंतर्गत मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर एसी लोकल ट्रेनची सेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसी लोकल ट्रेनच्या सेवा वाढवण्यामागे मुख्य कारण उन्हाळा आणि प्रवाशांची वाढणी मागणी हे आहे. 5 मेपासून भाडं कमी केल्यानंतर एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. तसंच मेन लाइन CSMT-कल्याण-टिटवाळा-अंबरनाथ दरम्यान सेवा वाढवण्याची मागणी होत आहे. याच मागणीकडे लक्ष देत मध्य रेल्वेने हार्बर लाइनवर चालणाऱ्या एसी लोकल ट्रेन मेन लाइनवर शिफ्ट करत सेवा वाढवल्या आहेत. 44 वरुन 56 फेऱ्या - या फेऱ्या वाढल्यानंतर आता CSMT-कल्याण-टिटवाळा-अंबरनाथ दरम्यान एसी लोकलची संख्या वाढून 44 वरुन 56 झाली आहे. तसंच रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशीही एसी लोकलच्या 14 सेवा या ट्रॅकवर धावतील. याआधी सुट्ट्यांच्या दिवशी ही सेवा दिली जात नव्हती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाडं कमी करण्यात आल्यामुळे प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. संख्या वाढल्यानंतर एसी लोकल वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत होती. हे लक्षात घेता आम्ही सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सेवा वाढल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल. मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, हार्बर मार्गावरील एसी लोकलसाठी ज्या प्रवाशांची पास काढला होता, ते नॉन एसीच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करू शकतात. तसंच दोन ट्रेनमधील भाड्यातील जे अंतर असेल ते पैसे रेल्वे परत देईल. यासाठी प्रवासी बुकिंग काउंटरवर पैसे परत घेऊ शकतात.

  हे वाचा - BMCची मोठी कारवाई! मुंबईच्या गोवंडी परिसरात 200 झोपड्या जमीनदोस्त

  डाउन ट्रेन - टिटवाला लोकल वेळ सकाळी 6.30 वाजता डोंबिवली लोकल CSMT वरुन सकाळी 10.22 वाजता अंबरनाथ लोकल CSMT वरुन दुपारी 1.15 वाजता संध्याकाळी 5 वाजता अंबरनाथ लोकल दादरवरुन संध्याकाळी 7.39 वाजता ठाणे लोकल CSMT वरुन सकाळी 10.20 वाजता अप ट्रेन - CSMT लोकल ठाणेवरुन सकाळी 5.24 वाजता CSMT लोकल टिटवालावरुन सकाळी 8.33 वाजता CSMT लोकल डोंबिवलीवरुन सकाळी 11.48 वाजता CSMT लोकल अंबरनाथवरुन दुपारी 3.12 वाजता आणि रात्री 8.50 वाजता दादर लोकल अंबरनाथवरुन संध्याकाळी 6.30 वाजता
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Central railway, Mumbai local, Train

  पुढील बातम्या