Home /News /sport /

IPL प्रसारण हक्क खरेदी करण्याच्या शर्यतीमध्ये Google ची एन्ट्री! बड्या कंपन्यांमध्ये रंगणार वॉर

IPL प्रसारण हक्क खरेदी करण्याच्या शर्यतीमध्ये Google ची एन्ट्री! बड्या कंपन्यांमध्ये रंगणार वॉर

आयपीएलच्या या सिझननंतर बीसीसीआय (BCCI) प्रसारण हक्कांचा लिलाव करणार आहे. या लिलावाच्या शर्यतीमध्ये गूगलची (Google) एन्ट्री झाली आहे.

    मुंबई, 12 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा सुरू असतानाच बीसीसीआयनं पुढील आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय लीग आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू उत्सुक असतात. क्रिकेटचे नियमित सदस्य नसलेल्या देशांमध्येही आयपीएलच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. आयपीएलची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन जगातील दिग्गज कंपन्यांनी यामध्ये रस दाखवला आहे. आयपीएलच्या या सिझननंतर बीसीसीआय (BCCI) प्रसारण हक्कांचा लिलाव करणार आहे. या लिलावाच्या शर्यतीमध्ये अ‍ॅमेझॉन (Amazon), डिस्ने (Disney) यांच्यापाठोपाठ गूगल (Google) कंपनी देखील सहभागी झाली आहे. बीसीसीआय 2023 ते 2027 या कालावधीसाठी प्रसारण हक्कांचा लिलाव करणार आहे. सध्या आयपीएलचे प्रसारण हक्क 'स्टार स्पोर्ट्स'कडे आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 'अमेरिकी टेक कंपनी अल्फाबेट इंकने बीसीसीआयच्या प्रसारण हक्काच्या लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्र खरेदी केले आहेत. यूट्यूब (YouTube) हा व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म या कंपनीकडं आहे. अर्थात या कंपनीकडून याबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतील टेलिव्हिजन चॅनेल सूपर स्पोर्ट्स समुहानं देखील याबाबतचे कागदपत्रं खरेदी केले आहेत. IPL 2022 : रोहितला आऊट करण्यासाठी धोनी रचणार चक्रव्यूह, हिटमॅन देणार का उत्तर? या सर्व कंपन्यांनी कागदत्रांची खरेदी केली  म्हणजे त्यांना बोली लावाली लागेल असा अर्थ होत नाही. त्यांना कोणत्याही टप्प्यात या लिलावातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. आयपीएल स्पर्धेच्या प्रसराण हक्कासाठी Amazon.com इंक, द वॉल्ट डिस्ने, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड, सोनी ग्रुप कॉर्प, झी एन्टरटेन्मेंट, आणि ड्रीम 11 या कंपन्या सहभागी आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Google, Ipl 2022

    पुढील बातम्या