नवी दिल्ली, 16 मार्च : टाटा सन्सचे सीएफओ सौरभ अग्रवाल यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहेत. सौरभ यांना आधुनिक भांडवली बाजाराचे चाणक्य म्हटले तर वावगे ठरणार नाही. कठिणातील कठीण कॉर्पोरेट डील पूर्ण केलेल्या सौरभला देशातील सर्वात मोठे विलीनीकरण पूर्ण करण्याचे श्रेयही जाते. अब्ज डॉलर कंपनी व्होडाफोन आणि आयडिया यांना एकत्र करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. टाटा समूहात चेअरमन एन रामचंद्रन यांच्यानंतर त्यांचे सर्वोच्च स्थान आहे. त्यांचा पगारच त्यांच्या मेहनतीविषयी सर्व सांगून जातो. सौरभने यापूर्वी स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि डीएसपी मेरिल लिंच यांसारख्या मोठ्या समूहांमध्ये काम केलेय.
सौरभ अग्रवाल यांना दोन दशकांहून अधिकचा इन्व्हेस्टमेंट बँकिंग अनुभव आहे. टाटा सन्समध्ये सामील होण्यापूर्वी ते आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे प्रमुख होते. आदित्य बिर्ला नुवोको लिमिटेड आणि ग्रासिम लिमिटेड यांची चरिंग करण्याचे श्रेय देखील त्यांनाच जाते. 2014 मध्ये ज्यावेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा IPO आला तेव्हा अग्रवाल त्याचे सल्लागार होते.
5 वर्षात मालामाल व्हायचंय? पोस्ट ऑफिसची 'ही' स्किम आहे बेस्ट
सौरभ अग्रवाल यांनी आयआयटी रुरकी येथून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता येथून एमबीए देखील केले. सौरभ अग्रवाल यांना कॅपिटल मार्केटचं चांगलं ज्ञान आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षांनीही त्यांच्या या क्षमतेचे कौतुक केलेय.
2 हजारांचं कर्ज घेऊन सुरु केला बांबू प्रोडक्ट्सचा व्यवसाय, आता करतेय लाखोंची कमाई!
सौरभ अग्रवाल यांनी देशातील सर्वात मोठा विलीनीकरणाचा करार केला होता. आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये असताना त्यांनी आयडिया आणि व्होडाफोनचे विलीनीकरण करून घेतले. हे विलीनीकरण 28 अब्ज डॉलर्सचे होते. याशिवाय अल्ट्राटेककडून जेपी सिमेंटच्या अधिग्रहणामध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देशातील सर्वात यशस्वी गुंतवणूक बँकर्सपैकी ते एक आहेत. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या भारत आणि दक्षिण आशिया युनिटसाठी ते कॉर्पोरेट फायनान्सचे प्रमुख राहिले आहेत. याशिवाय, ते डीएसपी मेरिल लिंचच्या गुंतवणूक बँकिंग विभागाचे प्रमुख देखील राहिलेय.
सौरभ अग्रवाल यांना टाटा सन्सचे सीएफओ म्हणून भरघोस पगार मिळतो. 2022 मध्ये टाटा सन्सने अग्रवाल यांना वार्षिक पेनसेशन म्हणून 26 कोटी रुपये दिले होते. अशा प्रकारे त्यांना दरमहा सव्वा दोन कोटी रुपये मिळतात. म्हणजेच हवे असल्यास ते दर महिन्याला मर्सिडीज कार आणि बंगला खरेदी करू शकतात. 2021 मध्ये त्यांना 21.45 कोटी रुपये मिळाले. अशाप्रकारे त्यांना 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 21 टक्के जास्त पगार मिळाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News