मराठी बातम्या /बातम्या /मनी /Rules Changing From 1st June: तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम आजपासून बदलणार

Rules Changing From 1st June: तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम आजपासून बदलणार

Rules Changing from 1st June 2021: LPG गॅसच्या किंमतीपासून आयटीआर फायलिंग वेबसाइटपर्यंत काही महत्त्वाच्या बाबींमध्ये आजपासून बदल होत आहेत. जाणून घ्या काय आहेत हे बदल ज्यांच्या तुमच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो.

Rules Changing from 1st June 2021: LPG गॅसच्या किंमतीपासून आयटीआर फायलिंग वेबसाइटपर्यंत काही महत्त्वाच्या बाबींमध्ये आजपासून बदल होत आहेत. जाणून घ्या काय आहेत हे बदल ज्यांच्या तुमच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो.

Rules Changing from 1st June 2021: LPG गॅसच्या किंमतीपासून आयटीआर फायलिंग वेबसाइटपर्यंत काही महत्त्वाच्या बाबींमध्ये आजपासून बदल होत आहेत. जाणून घ्या काय आहेत हे बदल ज्यांच्या तुमच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो.

नवी दिल्ली, 01 जून: देशभरात आजपासून अर्थात 1 जून 2021 पासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होत आहेत. यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत (LPG gas Price), विमानप्रवास भाडं (Flight Fare), बँक ऑफ बडोदाने लागू केलेली पॉझिटिव्ह पे सिस्टिम (Bank of Baroda Positive Pay System), इन्कम टॅक्स फायलिंगची वेबसाइट (Income Tax Filing new Portal), गुगल फोटोजचे अनिलिमिटेड स्टोरेजमध्ये (Google Photos Unlimited Storage) झालेले बदल, पीएफ खातं आणि आधार कार्ड (PF Account and Aadhar Card Linking) लिंकिंग इ. या बदलांचा समावेश आहे. यातील बहुतांश बदलांचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. या बदलांबाबत सविस्तर जाणून घ्या...

1. बँक ऑफ बडोदामध्ये चेक पेमेंट सिस्टिममध्ये बदल

बँक ऑफ बडोदामध्ये पॉझिटिव्ह पे सिस्टिम बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी 1 जून 2021 पासून पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन (Positive Pay Confirmation) अनिवार्य केले आहे. ग्राहक फसवणुकीची शिकार होऊ नयेत हा यामागचा मानस आहे. पॉझिटिव्ह पे प्रणाली एक प्रकारे फ्रॉड शोधणारं टूल आहे. या सिस्टिम अंतर्गत ग्राहकांने चेक जारी केल्यानंतर बँकेला संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. ही माहिती एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमच्या माध्यमातून देता येईल. चेक पेमेंट करण्याआधी बँक ही माहिती क्रॉस चेक करेल. जर यामध्ये कोणताही गोंधळ आढळून आल्यास बँक तो चेक रिजेक्ट करेल.

हे वाचा-कर्ज घेतलंय? 'या' चुका अजिबात करू नका, बसू शकतो मोठा फटका

2. LPG गॅसचे नवे दर

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती बदलणार एक जूनपासून एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये (LPG Gas Price) देखील बदल होऊ शकतो, काही वेळा या किंमती देखील स्थिर राहतात. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या नव्या किंमती जारी केल्या जातात. सध्या देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 809 रुपये आहे, तर 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती देखील बदलू शकतात.

3. गुगल फोटोजवरील स्पेस आता फ्री असणार नाही

जास्त गुगल स्टोरेजसाठी द्यावे लागणार वेगळे पैसे गुगल आता Google Photos या आपल्या अ‍ॅप्लिकेशनसाठी फ्री स्टोरेज सुविधा (Free Storage) बंद करणार आहे. जगभरातले कोट्यवधी युजर्स Google photos हे अ‍ॅप्लिकेशन वापरतात. 1 जूनपासून गुगल प्रत्येक अकाउंटला एकूण 15 जीबी क्लाउड स्टोरेज देणार असून, त्यात गुगलच्या सगळ्या प्रॉडक्ट्समधल्या डेटाचा समावेश आहे. म्हणजेच एका अकाउंटचं Gmail, Google Docs, Sheets, Drives आणि गुगलच्या अन्य सेवांमध्ये मिळून एकूण 15 जीबी डेटा मोफत साठवता येऊ शकतो. 15 जीबीपेक्षा जास्त स्टोरेजसाठी आता Google One चं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. त्यात 100 जीबीच्या स्टोरेजसाठी दरमहा 149 किंवा वार्षिक 1499 द्यावे लागतील.

4. इन्कम टॅक्स फायलिंगच्या पोर्टलमध्ये बदल

1 जूनपासून काही दिवस बंद राहणार इन्कम टॅक्स ई-फायलिंगची साइट 1 जून ते 6 जून इन्कम टॅक्स विभागाचे ई-फायलिंग (Income Tax E-Filing Portal) पोर्टल बंद राहणार आहे. तर 7 जून रोजी इन्कम टॅक्स विभाग करदात्यांसाठी इन्कम टॅक्स ई-फायलिंगसाठी नवीन पोर्टल लाँच करेल. अर्थात आयटीआर भरण्याची अधिकृत साइट आता 7 जूनपासून बदलणार आहे. 7 जूनपासून ही साइट http://INCOMETAX.GOV.IN असेल. सध्या तुम्ही http://incometaxindiaefiling.gov.in या साइटचा वापर करत आहात.

5. YouTube वरून कमाई करणाऱ्यांना द्यावा लागणार टॅक्स

तुम्ही जर युट्यूबवरून कमाई करत असाल, तर 1 जूनपासून तुम्हाला YouTube ला पे करावं लागेल. युट्यूबवरून होणाऱ्या कमाईसाठी टॅक्स द्यावा लागेल. अर्थात केवळ त्याच Views साठी टॅक्स द्यावा लागेल जे अमेरिकन Viewers कडून मिळाले आहेत. 1 जून 2021 पासून हा नियम लागू होईल

हे वाचा-EPFO च्या नियमात बदल, कोरोना उपचारासाठी देखील काढता येतील पैसे; वाचा सविस्तर

6. आजपासून देशांतर्गत विमानप्रवास भाडं वाढणार

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) विमानप्रवास पुन्हा एकदा महाग होणार आहे. सरकारने डोमेस्टिक फ्लाइट्सच्या (Domestic Flights) भाड्याची लोअर लिमिट 13 ते 16 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही जर विमानप्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला अधिकचा भूरदंड बसणार आहे. विमान प्रवासभाड्यात झालेली ही वाढ एक जूनपासून (1st June) लागू होणार आहे. दरम्यान प्रवासभाड्याची कमाल मर्यादा सध्या स्थिर ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एअरलाइन कंपन्यांना मदत मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार 40 मिनिटांच्या प्रवासासाठी असणारं किमान भाडं 2300 वरून 2600 करण्यात आलं आहे. यामध्ये 13 टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय 40 ते 60 मिनिटांच्या प्रवासासाठी असणारं किमान भाडं 2900 वरून वाढवून 3300 प्रति व्यक्ती करण्यात आलं आहे.

7. पीएफ अकाउंटला आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य

प्रत्येक खातेधारकाचं पीएफ खातं आधार कार्डला लिंक असणं आवश्यक असणार आहे. ही जबाबदारी तुम्हाला नियुक्त करणाऱ्या कंपनीची असणार आहे, त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला याबाबत सूचना देणं आवश्यक असेल. 1 जूनपासून हा नियम लागू होत आहे. ईपीएफओने याविषयी एम्प्लॉयर्ससाठी एक नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे. नोकरी देणाऱ्या कंपनीने हे काम केलं नाही तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाऊ शकते. सब्सक्रायबर्सचे UAN  देखील आधारसह व्हेरिफाय असणं आवश्यक आहे.

 

First published:

Tags: Aadhar card link, Google, Income tax, LPG Price, Pf news