नवी दिल्ली, 01 जून: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of Coronavirus) देशभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) आहे. शिवाय अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने आर्थिक संकटाचा (Financial Crisis During Corona Pandemic) देखील सामना करावा लागत आहे. अशावेळी कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी पैशाची जमावजमव करताना अनेकांची तारांबळ उडते. त्यामुळे अनेकांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ईपीएफओने (EPFO) त्यांचा 6 कोटींपेक्षाही जास्त ग्राहकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा अॅडव्हान्स रक्कम काढण्याची संधी उपलब्ध केली आहे. याआधी मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) विशेष तरतूद केली. त्याअंतर्गत ईपीएफ सदस्य भविष्य निर्वाह निधीच्या 75 टक्के किंवा तीन महिन्यांचे मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता काढून घेऊ शकतात.
कामगार मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात असं म्हटलं आहे की, 'कोविड -19 पँडेमिकच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ग्राहकांना आधार देण्यासाठी ईपीएफओने आता आपल्या सदस्यांना नॉन-रिफंडेबल कोविड -19 आगाऊ रक्कम (COVID-19 advance) घेण्याची परवानगी दिली आहे'.
हे वाचा-15 लाखांचे होतील 21 लाख: 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 6 लाख रुपये व्याज
वाचा सविस्तर
-महामारीच्या वेळी सदस्यांची आर्थिक गरज भागविण्यासाठी विशेष विड्रालची तरतूद पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) मार्च 2020 मध्ये करण्यात आली.
-याकरता कामगार आणि रोजगार मंत्रालयाने प्रोव्हिडंट फंड स्कीम 1952 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यामध्ये परिच्छेद 68L मध्ये सबपॅरा समाविष्ट करण्यात आला होता.
-त्याअंतर्गत ईपीएफ सदस्य त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या (PF) 75 टक्के किंवा तीन महिन्यांचे मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता काढून घेऊ शकतात. ही रक्कम नॉन रिफंडेबल असेल. जी रक्कम कमी असेल ती पुरवण्यात येईल.
-ईपीएफ खातेधारक यापेक्षा कमी रकमेसाठी देखील अर्ज करू शकतात.
-ईपीएफ खातेधारकांसाठी COVID-19 advance एक चांगली आर्थिक मदत आहे, विशेषत: ज्यांचा पगार दरमहा 15000 किंवा त्यापेक्षा कमी आहे.
हे वाचा-1 जूनपासून होणार हे 6 मोठे बदल, तुमच्यावर होणार असा परिणाम
-ईपीएफओने 76.31 लाखाहून अधिक कोव्हिड-19 अॅडव्हान्सचे दावे निकाली काढले आहेत. ज्यायोगे आजपर्यंत एकूण 18,698.15 कोटी रुपये देण्यात आले आहेत
-या सदस्यांनी ज्यांनी गेल्यावर्षी कोविड -19 Advance लाभ घेतला आहे ते देखील आता दुसऱ्यांदा यासाठी अर्ज करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal