मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Success Story: 8 महिन्यात 30 लाखांपर्यंत पोहोचली कमाई, तुम्ही देखील करू शकता हा व्यवसाय

Success Story: 8 महिन्यात 30 लाखांपर्यंत पोहोचली कमाई, तुम्ही देखील करू शकता हा व्यवसाय

व्यवसायाच्या अशाच एका मार्गाची माहिती येथे देत आहोत, की जो व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. तसंच, कमी कालावधीत चांगला फायदाही मिळू शकतो.

व्यवसायाच्या अशाच एका मार्गाची माहिती येथे देत आहोत, की जो व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. तसंच, कमी कालावधीत चांगला फायदाही मिळू शकतो.

व्यवसायाच्या अशाच एका मार्गाची माहिती येथे देत आहोत, की जो व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. तसंच, कमी कालावधीत चांगला फायदाही मिळू शकतो.

नवी दिल्ली, 02 जून: नियमित आणि स्थिर उत्पन्नाचा मार्ग म्हणून नोकरीला प्राधान्य दिलं जातं; मात्र त्याबरोबर येणारी बंधनंही खूप असतात. काही जणांना त्या बंधनांसह राहायला जमतं, तर काही जण तडजोडीने तसं करतात. काही जण मात्र त्या बंधनांना कंटाळतात आणि म्हणून व्यवसायाचा मार्ग स्वीकारतात. व्यवसायाच्या अशाच एका मार्गाची माहिती येथे देत आहोत, की जो व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. तसंच, कमी कालावधीत चांगला फायदाही मिळू शकतो. तो व्यवसाय आहे ई-व्हेइकल्स अर्थात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (Electric Vehicles). सध्याच्या काळात इलेक्ट्रिक वाहनाची बाजारपेठ वेगाने वाढते आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतींत वेगाने वाढ होत आहे. तसंच प्रदूषणही वाढतं आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर ई-सायकल्सचा (E-Cycles) व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करणं सहज शक्य आहे. बिहारच्या (Bihar) प्रशांत कुमार (Prashant Kumar) नावाच्या 52 वर्षांच्या व्यक्तीने गेल्या आठ महिन्यांत 250हून अधिक ई-सायकल्सची विक्री केली आहे आणि 25 ते 30 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीतून (Delhi University) मास्टर्सचे शिक्षण घेतल्यानंतर 10 वर्षांपर्यंत प्रशांत यांनी मार्केटिंगचं काम केलं. त्यानंतर काही वर्षं त्यांनी मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम केलं. त्यानंतर त्या विषयातली त्यांची रुची वाढली. त्यांनी या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करायला सुरुवात केली. पर्मनंट मॅग्नेट जनरेटरही (PMG) त्यांनी विकसित केला. त्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक बाइक विकसित करण्याबद्दल विचार सुरू केला. हे वाचा-Success Story: 'हा' व्यवसाय सुरू करून दोन भाऊ बनले कोट्यवधींचे मालक प्रशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ई-सायकल (E-Cycle) तयार करण्यासाठी कच्चा माल दिल्लीतून खरेदी करतात. त्यानंतर आपल्या फॅक्टरीत त्याच्या साह्याने ई-सायकल विकसित करतात. एक सायकल तयार करण्यासाठी 20 ते 22 हजार रुपये खर्च येतो. ग्राहकांना या सायकलची विक्री 35 हजार रुपयांमध्ये केली जाते. ही सायकल मिड ड्राइव्ह मोटर टेक्नॉलॉजीवर आधारित असून, ती बॅटरीवर (Battery) आणि पॅडलवर (Pedal) अशा दोन्ही पद्धतींनी चालवता येते. त्यातून बॅटरीच्या ऊर्जेची बचत होते. या सायकलमध्ये 24 व्होल्ट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी (Lithium Ion Battery) वापरण्यात येते. एकदा चार्ज केल्यावर या बॅटरीच्या साह्याने सायकल 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. मुख्य म्हणजे ही बॅटरी घरीच सहजपणे चार्ज करणं शक्य आहे. हे वाचा-6 कोटी नोकरदार वर्गासाठी मोदी सरकारचं गिफ्ट, PF खात्यात येणार अधिक पैसे ही सायकल ताशी जास्तीत जास्त 25 किलोमीटर वेगाने चालू शकते. ही सायकल चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन (Registration) किंवा लायसन्सची (License) गरज लागत नाही. कोणीही महिला, मुलं किंवा वयोवृद्ध व्यक्तीही ही सायकल व्यवस्थितपणे चालवू शकतात. सध्या प्रशांत यांनी voltron.in.net या नावाची वेबसाइट सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना देशभरातून ऑर्डर्स मिळतात. यासाठी त्यांनी काही ट्रान्स्पोर्टिंग कंपन्यांशीही टाय-अप केलं आहे. ऑर्डर केल्यानंतर 10 दिवसांच्या आत ते ग्राहकांना सायकल पोहोच करतात. ग्राहकांना एक युजर गाइड दिलं जातं. ते वाचून ग्राहकांना स्वतःच सायकलची जोडणी आणि सेटिंग्ज करता येतात. त्यात काही अडचण असेल, तर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून किंवा स्थानिक कर्मचाऱ्यांना पाठवून त्या अडचणी दूर केल्या जातात. काही राज्यांत प्रशांत यांनी डीलरशिप चेन (Dealership Chain) तयार केली आहे. त्यातूनही ई-सायकल खरेदी करता येते.
First published:

Tags: Business News, Small business

पुढील बातम्या