मराठी बातम्या /बातम्या /मनी /Success Story: 'हा' व्यवसाय सुरू करून दोन भाऊ बनले कोट्यवधींचे मालक

Success Story: 'हा' व्यवसाय सुरू करून दोन भाऊ बनले कोट्यवधींचे मालक

या दोन्ही भावांनी स्वत:चा व्यवसाय (Own Business) सुरू करण्याचा विचार केला होता आणि तो त्यांनी उभा देखील केला. स्वत:बरोबर इतरांनाही रोजगाराची संधी मिळावी असा त्यांचा मानस होता.

या दोन्ही भावांनी स्वत:चा व्यवसाय (Own Business) सुरू करण्याचा विचार केला होता आणि तो त्यांनी उभा देखील केला. स्वत:बरोबर इतरांनाही रोजगाराची संधी मिळावी असा त्यांचा मानस होता.

या दोन्ही भावांनी स्वत:चा व्यवसाय (Own Business) सुरू करण्याचा विचार केला होता आणि तो त्यांनी उभा देखील केला. स्वत:बरोबर इतरांनाही रोजगाराची संधी मिळावी असा त्यांचा मानस होता.

नवी दिल्ली, 27 मे: एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द जर तुमच्या अंगी असेल तर काहीही शक्य होतं, असं म्हटलं जातं. या जिद्दीला चिकाटी आणि कष्टांची जोड दिली तर तुम्ही नक्की यशस्वी होता. दरम्यान हेच सत्यात उतरवलं आहे मयांक आणि आदित्य आर्या (Mayank and Aditya Arya) या दोन भावांनी. या दोन्ही भावांनी स्वत:चा व्यवसाय (Own Business) सुरू करण्याचा विचार केला होता आणि तो त्यांनी उभा देखील केला. स्वत:बरोबर इतरांनाही रोजगाराची संधी मिळावी असा त्यांचा मानस होता. आता आर्या ब्रदर्सच्या या कंपनीशी हजारो युवक जोडले गेले आहेत. शिवाय त्यांची कंपनी महिलांना देखील आत्मनिर्भर बनवत आहे. या कंपनीशी जोडल्या गेलेल्या महिला प्रति महिना 30 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिक कमाई करत आहेत.

नोएडामध्ये आहे कंपनी

मयांक आणि आदित्य आर्या या दोघांच्या कंपनीचं नाव आहे येस मॅडम (Yes Madam). ही कंपनी एक होम सलॉन सर्व्हिस देणारा स्टार्टअप आहे. याचा अर्थ तुम्ही यामध्ये बुकिंग करून Home Salon Service घरच्या घरी उपलब्ध करून घेऊ शकता. 2017 मध्ये आर्या बंधूंनी हा व्यवसाय सुरू केला होता. त्याचा उद्देश Salon व्यवसायात पारदर्शकता आणणं हा होता. या कंपनीचं मुख्यालय नोएडामध्ये आहे. या कंपनीमध्ये 1500 पेक्षा जास्त स्टाफ आहे.

हे वाचा-Gold- Silver Price Today: चांदीचे भाव गडगडले तर सोनं महागलं, इथे तपासा आजचे दर

50 हजार दरमहा कमावतात या कंपनीतील ब्यूटिशियन्स

येस मॅडममध्ये ब्यूटिशिअन्सना ठराविक मासिक पगार दिला जात नाही. तर त्यांच्या कामाच्या तासानुसार त्यांना कमिशन बेस्ड पगार दिला जातो. साधारणत: त्यांची मासिक कमाई 30 ते 60 हजार रुपये होते. उदाहरणार्थ जर एखाद्या ब्यूटिशियनने एक तास काम केले तर प्रति मिनिट 6 रुपये या हिशोबाने त्यांना 360 रुपये आकारले जातात. यामधील 300 रुपये ब्यूटिशियन आणि 60 रुपये येस मॅडम कंपनीचे असतात.

या कंपनीतील ब्यूटिशियन्स साधाराण 4-6 तास काम करतात. त्यामुळे दर दिवशी साधारण ते 1200-1800 रुपये कमावू शकतात. दर महिन्याला 25 दिवस या हिशोबाने त्यांची कमाई जवळपास 30000 ते 45000 पर्यंत जाऊ शकते. यापेक्षा काही तास अधिक काम केल्यास ही कमाई 50 हजारांपर्यंत जाते. दरम्यान या स्टार्टअपने या कंपनीतील महिला ब्यूटिशियन्सना सेल्फ डिफेन्सचे देखील धडे देण्याची योजना आखली आहे.

हे वाचा-रोज केवळ 1 रुपयाची बचत करून कमावू शकता मोठा नफा, वाचा कसे मिळवाल 15 लाख

2 कोटीवर पोहोचला आहे रेव्हेन्यू

येस मॅडम कंपनी कोणत्याही फंडिंगशिवाय आज 2 कोटी रेव्हेन्यू असणारी कंपनी बनली आहे. तर या कंपनीचं व्हॅल्यूएशन 50 कोटी झालं आहे. Yes Madam दरमहा 10 ते 15 टक्के या ग्रोथने विकास करत आहे. यावेळी या कंपनीची सर्व्हिस दिल्ली-एनसीआर, लखनऊ, चंदीगड या शहरात सुरू आहे. शिवाय ही कंपनी फ्रँचायझी मिळवण्याचीही संधी देत आहे, याकरता या स्टार्टअपने फ्रेंचायझी इंडियासह करार केला आहे.

First published:
top videos

    Tags: Business News, Small business