मराठी बातम्या /बातम्या /मनी /6 कोटी नोकरदार वर्गासाठी मोदी सरकारचं गिफ्ट, पुढील महिन्यात PF खात्यात येणार अधिक पैसे, वाचा सविस्तर

6 कोटी नोकरदार वर्गासाठी मोदी सरकारचं गिफ्ट, पुढील महिन्यात PF खात्यात येणार अधिक पैसे, वाचा सविस्तर

नोकरदार वर्गाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. पुढील महिन्यात पीएफ खात्यात जास्त पैसे येऊ शकतात. एम्प्लाइज प्रोव्हिडेंट फंड ऑर्गेनाइझेशन (employees provident fund organisation- EPFO) कडून कर्मचाऱ्यांना लवकरच ही खूशखबर मिळू शकते.

नवी दिल्ली, 02 जून: नोकरदार वर्गाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. पुढील महिन्यात पीएफ खात्यात जास्त पैसे येऊ शकतात. एम्प्लाइज प्रोव्हिडेंट फंड ऑर्गेनाइझेशन (employees provident fund organisation- EPFO) कडून कर्मचाऱ्यांना लवकरच ही खूशखबर मिळू शकते. कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जुलै अखेरपर्यंत देण्याची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. याकरता EPFO ला कामगार मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

6 कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मिळेल फायदा

कामगार मंत्रालयाकडून (labor Ministry) मंजुरी मिळाल्यानंतर पीएफच्या कक्षात येणाऱ्या सहा कोटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरेल. EPFO कडून फिक्सल इयर 2020-21 साी 8.5 टक्के व्याज जुलै अखेरपर्यंत दिले जाऊ शकते. मीडिया अहवालांच्या मते, व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट क्रेडिट केले जातील.

हे वाचा-EPFO च्या नियमात बदल, कोरोना उपचारासाठी देखील काढता येतील पैसे; वाचा सविस्तर

गेल्यावर्षी करावी लागली होती प्रतीक्षा

गेल्यावर्षी 2019-20 चं व्याज मिळण्यासाठी अनेक EPFO खातेधारकांना दहा महिन्यांसाठी वाट पाहावी लागली होती. EPFO ने फिक्सल इयर 2020-21 साठी व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेत दर 8.5 टक्के कायम ठेवले होते. शिवाय EPFO देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खातेधारकांना नॉन रिफंडेबल कोव्हिड-19 अॅडव्हान्स पैसे काढण्याची देखील मंजुरी देत आहे.

हे वाचा-PNB ग्राहकांसाठी खूशखबर! 1 जूनपासून बँकेत झाला मोठा बदल, कसा होणार फायदा?

Missed Call देऊन तपासा PF बॅलन्स

यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता

इतरही काही पद्धतींनी तुम्ही पीएफ बॅलन्स तपासू शकता. तुम्ही SMS च्या माध्यमातून, वेबसाइटचा वापर करून किंवा UMANG App वापरुन खात्यात किती रक्कम आहे हे तपासू शकता.

First published:

Tags: Epfo news, Money, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal