मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI च्या या खास योजनेत करा गुंतवणूक; कधीही जमा करता येतील पैसे आणि चांगल्या व्याजाची हमी

SBI च्या या खास योजनेत करा गुंतवणूक; कधीही जमा करता येतील पैसे आणि चांगल्या व्याजाची हमी

SBI Flexi Deposit Scheme: एसबीआयची (SBI) फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम ही योजना रेकरिंग डिपॉझिट (RD) सारखीच एक स्कीम आहे. मात्र यामध्ये तुम्हाला कधीही पैसे जमा करण्याची मुभा मिळते.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ग्राहकांसाठी विविध योजना ऑफर करते. अनेक चांगल्या बचत स्कीम बँकेकडून सादर करण्याच आल्या आहेत ज्यातून तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते. एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम देखील अशाच योजनांपैकी एक आहे. ही योजना रेकरिंग डिपॉझिट (RD) सारखीच एक स्कीम आहे. मात्र यामध्ये तुम्हाला कधीही पैसे जमा करण्याची मुभा मिळते. म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक महिन्यांचं पेमेंट करू शकता. यामध्ये इनस्टॉलमेंट अमाउंट देखील निश्चित नाही आहे. ग्राहक त्यांच्या हिशोबाने ही रक्कम कमी जास्त करू शकतात. जाणून घ्या स्कीमविषयी...

किती करू शकता गुंतवणूक?

एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट या योजनेमध्ये खाते उघडल्यानंतर तुम्ही कमीतकमी 5000 रुपये जमा करू शकता. एक इन्स्टॉलमेंट भरण्याची कमीतकमी रक्कम 500 रुपये आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला कमीतकमी 50,000 रुपये जमा करू शकता. यामध्ये तुम्ही महिन्यातून कधीही पैसे जमा करू शकता.

(हे वाचा-सावधान; वृद्ध पालकांचा योग्य सांभाळ करताय ना! नाहीतर वेतनात होणार मोठी कपात)

मॅच्यूरिटी पीरिएड

SBI Flexi Deposit स्कीमचा कमीतकमी कालावधी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष आहे. यामध्ये मिळणारं व्याज हे फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजाइतकंच आहे. वेळेआधी जर तुम्ही हे खातं बंद केलं तर काही प्रमाणात शुल्क तुम्हाला भरावं लागेल.

कशाप्रकारे उघडाल खातं?

या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नेटबँकिंगचा वापर करून यामध्ये खाते उघडू शकता. देशभरातील अनेक नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. अल्पवयीन मुलांसाठी देखील ही योजना उपलब्ध आहे. तुम्ही या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉइंट खाते उघडू शकता. नॉमिनी रजिस्टर करण्यासाठीही तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, खातं उघडतानाच तुम्ही नॉमिनी रजिस्टर करू शकता.

(हे वाचा-Gold Price: सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये घसरण, गुंतवणुकदारांना काहीसा दिलासा)

SBI Flexi Deposit Scheme मध्ये प्रीमॅच्युअर क्लोजरची देखील सुविधा आगे. मात्र यामध्ये 5 लाखांपर्यंतच्या डिपॉझिटसाठी सर्व टेन्योरमध्ये व्याज दर 0.50 टक्क्यांपर्यंत कापला जातो. तर पाच लाखांपेक्षा जास्त डिपॉझिटसाठी व्याज दर 1 टक्के कापला जाईल.

First published:

Tags: Money, SBI, Sbi account, SBI bank, SBI Bank News