नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: शनिवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. गुड रिटर्न्स च्या अहवालानुसार सोन्याचे दर (Gold Price Today) 457 रुपयांनी कमी होईन 46,390 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर (Silver Price Today) 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रति किलो झाले आहेत. आधीच्या सत्रामध्ये मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) चांदीची किंमत 68,241 रुपये प्रति किलो होती. तर सोन्याचे दर 661 रुपयांनी कमी होऊन 46,847 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Rates in International Market) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1,815 डॉलर प्रति औंस आणि चांदीचे दर 26.96 डॉलर प्रति औंसवर स्थीर आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते, डॉलर इंडेक्स कमजोर झाल्यामुळे सोन्याच्या दरात असा बदल पाहायला मिळाला आहे. सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today on 13th Feb 2021) दिल्लीतील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,390 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईमध्ये सोन्याचे दर 46,430 रुपये प्रति तोळावर व्यवहार करत आहेत. चेन्नईमध्ये हे दर 44,650 प्रति तोळा आहेत. दरम्यान आज 24 कॅरेट सोन्याचे दर 48,710 रुपये प्रति तोळा आहेत. चांदीचा आजचा भाव (Silver Price Today on 13th Feb 2021) शनिवारी चांदीच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. चांदीचे दर 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रति किलो आहेत. सर्वोच्च स्तरावरून 9000 पेक्षा जास्त किंमतीने उतरले सोन्याचे दर जाणकारांच्या मते अमेरिकन इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि बिटकॉइनच्या दरात तेजी आल्यामुळे सोन्याचांदीमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर काही काळासाठी 47,200 या स्तरावर ट्रेड करतील. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर एका टक्क्याने तर चांदीचे दर 0.33 टक्क्यांनी कमी झाले होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 च्या स्तरावर पोहोचले होते, त्यामुळे या सर्वोच्च स्तरावरुन सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.