लातूर 14 फेब्रुवारी : प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्भर कष्ट करत असतात. या सगळ्यात त्यांची केवळ एकच माफक अपेक्षा असते, ती म्हणजे वृद्धपकाळात मुलांनी त्यांची योग्य काळजी घ्यावी. मात्र, अनेक मुलांकडून आपलं हे कर्तव्यदेखील पूर्ण होत नाही. आता राज्यातील लातूर जिल्हा परिषदेनं (LZP) आपल्या सात कर्मचार्यांच्या पगारामध्ये 30 टक्के कपात सुरू केली आहे. परिषदेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शनिवारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात (Salary Reduction) करण्याचं कारण सांगितलं. हे कारण ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. ही कपात केली जात आहे कारण, हे कर्मचारी आपल्या वृद्ध पालकांची (Elderly Parents) योग्य काळजी घेत नाहीत किंवा त्यांचा सांभाळ करत नाही.
राहुल बोंद्रे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, विशेष गोष्ट ही आहे, की 12 मधील ज्या 6 कर्मचाऱ्यांविरोधात आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ते सर्व शिक्षक आहेत. बोंद्रे म्हणाले, की या कर्मचार्यांच्या पगारामध्ये करण्यात आलेल्या कपातीची रक्कम त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात वर्ग केली गेली आहे.
लातूर जिल्हा परिषदेनं मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या पालकांची काळजी न घेणाऱ्या सर्व कर्मचार्यांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा ठराव गेल्या मंजूर केला होता. राहुल बोंद्रे म्हणाले की, अशा निष्काळजी कर्मचार्यांच्या मासिक वेतनातील कपात गेल्या वर्षी डिसेंबरपासून सुरू झाली आहे.
बोंद्रे म्हणाले, की आम्ही 12 अशा तक्रारींची चौकशी करत आहोत, ज्यामध्ये पालकांनी त्यांची मुलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या 12 पैकी आम्ही 6 कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच इथून पुढेही प्रत्येक महिन्याला 30 टक्के कपात सुरूच राहिल, असंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.