Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमचं SBI सॅलरी अकाउंट आहे का? स्वस्त लोन आणि लॉकरसह मिळतील हे 5 मोठे फायदे

तुमचं SBI सॅलरी अकाउंट आहे का? स्वस्त लोन आणि लॉकरसह मिळतील हे 5 मोठे फायदे

SBI Salary Account:  ज्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI Salary Account) आहे, ते कर्मचारी विशेष फायदा मिळवू शकतात.

SBI Salary Account: ज्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI Salary Account) आहे, ते कर्मचारी विशेष फायदा मिळवू शकतात.

SBI Salary Account: ज्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI Salary Account) आहे, ते कर्मचारी विशेष फायदा मिळवू शकतात.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 मे: नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांचं सॅलरी अकाउंट (Know about your Salary Account) अत्यंत महत्त्वाचं असतं. तुमच्या सॅलरी अकाउंटबाबत तुम्हाला सर्व माहिती असणं देखील आवश्यक आहे. दरम्यान तुमच्या कंपनीवर हे अवलंबून असतं की तुमचं सॅलरी अकाउंट अर्थात ज्या खात्यात पगार पाठवला जाणार आहे ते कोणत्या बँकेत असेल. काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे विविध बँकांमध्ये देखील सॅलरी अकाउंट असतात. मात्र ज्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI Salary Account) आहे, ते कर्मचारी विशेष फायदा मिळवू शकतात. अशा कर्मचाऱ्यांना बँकेकडून काही खास फायदे दिले जातात.

एसबीआयच्या वेबसाइटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार जर तुमचं सॅलरी अकाउंट एसबीआयमध्ये आहे तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज (Personal Loan), वाहन कर्ज (Vehicle Loan), शैक्षणिक कर्ज (Educational Loan) इत्यादींवर सवलत मिळते. याशिवाय काही अन्य फायदे देखील आहेत जे खातेधारकांना माहित असणं आवश्यक आहेत.

हे वाचा-SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बचत खातं घरबसल्या करा दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर

सॅलरी खातेधारकांना एसबीआय मल्टी सिटी चेक, SMS अलर्ट, फ्री ऑनलाइन NEFT/RTGS आणि देशातील कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा SBI देते. याशिवाय पाच मोठे फायदे देखील  एसबीआय सॅलरी खातेधारकांना मिळतील. जाणून घ्या

मिळतील हे पाच मोठे फायदे

1. लोन प्रोसेसिंग फीवर 50 टक्के सूट-  SBI अकाउंट खातेधार कोणतंही लोन जसं की वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादीच्या प्रोसेसिंग फीवर 50 टक्के सूट मिळेल

2. एअर अ‍ॅक्सिडेंटल डेथ कव्हर- एसबीआयच्या वेबसाइटनुसार, हवाई प्रवासाती दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणी सॅलरी अकाउंट खातेधारकाला एअर अ‍ॅक्सिडेंटल इन्शुरन्स (डेथ) कव्हर अंतर्गत 30 लाख रुपयांचा इन्शुरन्स मिळेल.

हे वाचा-Covid-19च्या काळात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, कोरोना रुग्णांना करतायेत लक्ष्य

3. अ‍ॅक्सिडेंट डेथ कव्हर: SBI सॅलरी अकाउंट खातेधारकाला 20 लाख रुपयांपर्यंत अक्सिडेंटर कव्हर मिळेल. याअंतर्गत कोणत्याही अपघातात खातेधारकाचा मृत्यू झाल्या 20 लाखांपर्यंत कव्हर मिळेल.

4.लॉकर चार्जमध्ये सूट- SBI त्याच्या सॅलरी अकाउंट होल्डर्सना लॉकर चार्जमध्ये 25 टक्के सूट प्रदान करते

5. ओव्हरड्राफ्ट सुविधा- ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा एसबीआय सॅलरी अकाउंट होल्डर्सना घेता येईल. तुम्हाला या सुविधेअंतर्गत दोन मगिन्याच्या सॅलरीइतकी रक्कम मिळू शकते.

First published:

Tags: Salary, SBI, Sbi account, SBI bank, SBI Bank News