मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बचत खातं घरबसल्या करा दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बचत खातं घरबसल्या करा दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर

SBI CBO result 2020

SBI CBO result 2020

स्‍टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सध्या ग्राहकांना त्यांच्या वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून त्यांचं खातं अगदी सोप्या पद्धतीने दुसऱ्या शाखेमध्ये ट्रान्सफर (Saving Account Transfer)करण्याची सुविधा देत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 मे: देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना काळात त्यांच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना या महत्त्वाच्या कामासाठी आता बँक शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. स्‍टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सध्या ग्राहकांना त्यांच्या वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून त्यांचं खातं अगदी सोप्या पद्धतीने दुसऱ्या शाखेमध्ये ट्रान्सफर (Saving Account Transfer) करण्याची सुविधा देत आहे.  या कामाकरता तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही योनो एसबीआय (YONO SBI), योनो लाइट (YONO Lite) आणि बँकेची वेबसाइट वापरून हे काम पूर्ण करू शकता.

बचत खाते दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करण्यासाठी करा हे काम

-एसबीआयची अधिकृत वेबसाइट www.onlinesbi.com वर लॉग इन करा. याठिकाणी तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकून पर्सनल बँकिंगचा पर्याय निवडा.

-टॉप मेन्यू बारवर ई-सर्व्हिसेसवर जा आणि ट्रान्सफर ऑफ सेव्हिंग अकाउंटवर क्लिक करा. त्यानंतर जे खाते ट्रान्सफर करायचे आहे ते निवडा

-जर तुमच्याकडे केवळ एकच बँक खाते आणि आणि तुमची कस्टमर इन्फरमेशन फाइल (CIF) असेल तर हा पर्याय आपोआप निवडला जाईल.

हे वाचा-Covid-19च्या काळात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, कोरोना रुग्णांना करतायेत लक्ष्य

-आता तुम्हाला ज्या बँकेत खातं ट्रान्सफर करायचं आङे त्या बँकेचा कोड निवडावा लागेल. नियम आणि अटी वाचून सबमिटवर क्लिक करा

-तुमच्या खात्याच्या ट्रान्सफरचे सर्व डिटेल्स सध्याच्या शाखेच्या कोड आणि नवीन बँकेच्या कोडसह व्हेरिफाय करा, त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा.

-यानंतर तुम्हाला ओटीपी येईल, ओटीपी टाकून पुन्हा एकदा कन्फर्म करा

-यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये तुमचा शाखा ट्रान्सफर करण्याचं काम पूर्ण झाल्याचा मेसेज येईल. अर्थात तुमचा अर्ज यशस्वीपणे रजिस्टर्ड झाला आहे.

ग्राहकांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे ही प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असेल. वेबसाइटशिवाय तुम्ही योनो एसबीआय (YONO SBI), योनो लाइट (YONO Lite)  वापरूनही हे काम पूर्ण करू शकता.

First published:

Tags: SBI, Sbi account, State bank of india