Home /News /crime /

Covid-19 च्या काळात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, कोरोना रुग्णांना करतायेत लक्ष्य; या गोष्टींची घ्या काळजी

Covid-19 च्या काळात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, कोरोना रुग्णांना करतायेत लक्ष्य; या गोष्टींची घ्या काळजी

गुन्हेगार कोरोना रुग्णांना असलेल्या गरजेच्या आणि त्यांच्या डिटेल्सच्या (Details) माध्यमातून त्यांची फसवणूक (fraud) करत आहेत. त्यामुळे, नातेवाईकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांची माहिती आणि मदतीची मागणी करताना सावध राहाणं अत्यंत गरजेचं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 10 मे : सध्या देशभरात कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशात या परिस्थितीचाही फायदा घेणं सायबर गुन्हेगार (cyber criminals) सोडत नसल्याचं चित्र आहे. हे गुन्हेगार कोरोना रुग्णांना असलेल्या गरजेच्या आणि त्यांच्या डिटेल्सच्या (Details) माध्यमातून त्यांची फसवणूक (fraud) करत आहेत. त्यामुळे, नातेवाईकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांची माहिती आणि मदतीची मागणी करताना सावध राहाणं अत्यंत गरजेचं आहे. मदतीसाठी आलेल्या फोनवर चौकशी केल्यानंतरच विश्वास ठेवणं आवश्यक आहे. कोरोना काळात रुग्णांच्या मदतीसाठी अनेक ग्रुप सक्रीय झाले आहेत. या ग्रुपमध्ये कोरोना रुग्णांना हवी असलेल्या मदतीसह त्यांची माहिती शेअर केली जात आहे. काहींना ऑक्सिजन सिलेंडर, प्लाझमा तर काहींना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडत आहे. मात्र, सायबर गुन्हेगार याच माहितीच्या आधारे रुग्णांना लूटत आहेत. सतत येत असलेल्या या फसवणुकीच्या तक्रारींमुळे सायबर एक्सपर्टसनं सल्ला दिला आहे, की रुग्णाच्या नातेवाईकांनी माहिती शेअर करताना सावध राहावं आणि डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नये. एक्सपर्टसनं सांगितलं, की हे गुन्हेगार फसवणूक करण्याआधी भावनिकरित्या जोडलं जाण्याचा प्रयत्न करतात. गुन्हेगारांना रुग्णाची गरज, सर्व माहिती आणि फोन नंबर ग्रुपमध्येच मिळतो. यानंतर ते नातेवाईकांना फोन करुन सांगतात, की त्यांनी त्यांच्या घरच्या सदस्यासाठी हे ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतलं होतं, मात्र आता या रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे हे सिलेंडर आता त्यांच्या उपयोगाचं नाही. तुम्हाला गरज आहे, त्यामुळे जितक्या पैशांत घेतलं, तितक्याच पैशात तुम्हाला देऊ, असंही सांगतात. यानंतर रुग्णाचे नातेवाईक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती समोरासमोर भेटल्याशिवाय विश्वास ठेवू नका किंवा तुम्हाला प्रत्यक्षात भेटणं शक्य नसल्यास तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही त्याठिकाणी पाठवू शकता. याशिवाय पैसेही ऑनलाईन पाठवण्याऐवजी कॅश स्वरुपातच देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona patient, Financial fraud, Online fraud

    पुढील बातम्या