Home /News /money /

5 हजारांची गुंतवणूक ते 34 हजार कोटींचे मालक; राकेश झुनझुनवाला यांचा थक्क करणारा प्रवास

5 हजारांची गुंतवणूक ते 34 हजार कोटींचे मालक; राकेश झुनझुनवाला यांचा थक्क करणारा प्रवास

राकेश झुनझुनवाला यांनी 1986 मध्ये टाटा टीच्या (Tata Tea) शेअर्समध्ये 5 लाखांचा पहिला फायदा मिळवला. शेअर बाजारातील हे त्यांचं पहिलं यश होतं.

मुंबई 05 जुलै : भारताचे वॉरेन बफे (Warren Buffet) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwal) यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. एका कर अधिकाऱ्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राकेश झुनझुनवाला यांचा बिग बुल (Big Bull) बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय उत्कंठावर्धक आहे. जाणून घेऊ या बिग बुलची ही कहाणी ... 1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक सुरू : राकेश झुनझुनवाला यांनी महाविद्यालयात असतानाच 1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) जवळपास 150 अंकावर होता. 5 हजार रुपयांच्या भांडवलासह त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. फोर्ब्सच्या अहवालानुसार, आता राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 6.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 34,387 कोटी रुपये आहे. मोठ्या कमाईची संधी! या आठवड्यात 14,076 रुपयांची गुंतवणूक करून कमवा चांगला नफा पहिलं यश -1986 मध्ये तीन महिन्यांत पैसे तिप्पट वाढले : राकेश झुनझुनवाला यांनी 1986 मध्ये टाटा टीच्या (Tata Tea) शेअर्समध्ये 5 लाखांचा पहिला फायदा मिळवला. शेअर बाजारातील हे त्यांचं पहिलं यश होतं. त्यांनी टाटा चहाचे 5 हजार शेअर्स खरेदी केले होते आणि अवघ्या तीन महिन्यांत त्याची किंमत तिप्पट झाली. हर्षद मेहताच्या काळात राकेश झुनझुनवाला होते बेअर कार्टेलचा हिस्सा: भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा ठरलेला हर्षद मेहता घोटाळा 1992 मध्ये (Harshad Mehta Scam -1992) झाला. त्यानंतर शेअर्सचं शॉर्ट सेलिंग करुन झुनझुनवाला यांनी बक्कळ कमाई केली. ते बेअर कार्टेलचा एक हिस्सा होते. अशाच एका बेअर कार्टेलचे नेतृत्व मनू माणेक करत होते, ज्यांना ब्लॅक कोब्रा म्हणून ओळखले जाते. यात राधाकिशन दमानी आणि राकेश झुनझुनवाला यांच्यासह अनेक लोकांचा समावेश होता. हर्षद मेहतावर बनलेल्या ‘स्कॅम1992’ या वेब सीरिजमध्येही या सर्वांचा उल्लेख आहे. 1992मध्ये पत्रकार सुचेता दलाल यांनी हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणला आणि त्यानंतर शेअर बाजार जोरदार कोसळला. परत घेतली जातेय ही 20 रुपयाची नोट, तुमच्याकडे असेल तर बदलून मिळवा हजारो रुपये रेअर एंटरप्रायझेस: राकेशमधील ‘RA’ आणि रेखामधील ‘RE’ 1987 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवाला यांच्याशी लग्न केलं. रेखाही शेअर बाजारातील गुंतवणूकदार होत्या. 2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी ‘रेअर एंटरप्राइजेस’ (Rare Enterprises) ही स्वतःची शेअर ट्रेडिंग फर्म सुरू केली. स्वत:च्या आणि पत्नीच्या नावातील आद्याक्षरे एकत्र करून त्यांनी हे नाव दिलं आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या 37 शेअर्सची किंमत सुमारे 20 हजार कोटी रुपये : 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांची 37 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक आहे. यामध्ये Titan Company, Tata Motors, Crisil, Lupin, Fortis Healthcare, Nazara Technologies, Federal Bank, Delta Corp, DB Realty and Tata Communications (टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नाझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्स) यांचा समावेश आहे. त्यांचे एकूण मूल्य 19,695.3 कोटी आहे. त्यांच्याकडे टायटन (7,879 कोटी रुपये), टाटा मोटर्स (1,474.4 कोटी रुपये) आणि क्रिसिल (1,063.2 कोटी रुपये) हे सर्वात मूल्यवान शेअर्स आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Money, Share market, Start business

पुढील बातम्या