मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोठ्या कमाईची संधी! या आठवड्यात 14,076 रुपयांची गुंतवणूक करून कमवा चांगला नफा

मोठ्या कमाईची संधी! या आठवड्यात 14,076 रुपयांची गुंतवणूक करून कमवा चांगला नफा

7 जुलै रोजी शेअर बाजारातून (Share Market) चांगली कमाई करण्यासाठी तुमच्याकडे दोन संधी आहेत. या आठवड्यात दोन नवे आयपीओ (IPO) सबस्क्रिप्शनसाठी (New IPO's Open for Subcription) खुले होणार आहेत. त्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा कमावू शकाल.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 5 जुलै: पैसे कमावण्याची एखादी चांगली संधी तुम्ही शोधत आहात का? मग 7 जुलै रोजी शेअर बाजारातून (Share Market) चांगली कमाई करण्यासाठी तुमच्याकडे दोन संधी आहेत. या आठवड्यात दोन नवे आयपीओ (IPO) सबस्क्रिप्शनसाठी (New IPO's Open for Subscription) खुले होणार आहेत. त्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा कमावू शकाल. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Clean Science & Technology) आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GR Infraprojects) या दोन कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात शेअर बाजारात येणार आहेत. त्या दोन्ही आयपीओच्या माध्यमातून मिळून 2500 कोटी रुपयांहून अधिक निधी उभा राहण्याची अपेक्षा आहे. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स या दोन्ही कंपन्यांचा आयपीओ 7 जुलै रोजी खुला होणार असून, 9 जुलै रोजी बंद होणार आहे. अँकर गुंतवणुकदार (Anchor Investors) 6 जुलै रोजी बोली लावू शकतील. दोन्ही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून एकूण 2510 कोटी रुपये उभे करणार आहेत. या कंपन्यांचे शेअर्स मुंबई शेअर बाजार अर्थात BSE आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात NSE येथे नोंदवले जाणार आहेत. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी - क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीच्या आयपीओसाठी प्रति शेअर 880 ते 900 Price Band निश्चित केला गेला आहे. कंपनीच्या आयपीओचं एकूण मूल्य 1546.62 कोटी रुपये एवढं असून, विद्यमान प्रमोटर्स आणि शेअरधारकांकडून (Promoters & Shareholders) विक्री अर्थात Offer for sale (OFS) या माध्यमातून ते उभं केलं जाणार आहे.

(वाचा - Gold Price Today: मौल्यवान धातूच्या दरात आजही घसरण कायम; पाहा सोन्या-चांदीचा दर)

जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स - जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GR Infraprojects) या कंपनीच्या आयपीओसाठी 828 ते 837 Price Band निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून पाच रुपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेले 1.15 कोटी इक्विटी शेअर्स (Equity Shares) उपलब्ध केले जाणार आहेत. हे इक्विटी शेअर्स कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान गुंतवणूकदार विक्रीच्या माध्यमातून उपलब्ध करतील.

(वाचा - पोस्ट ऑफिसच्या PPF, SSY, NSC सह या 8 योजनांमध्ये पैसे होतील दुप्पट, वाचा सविस्तर)

जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीने आयपीओमध्ये 17 शेअर्सचा एक लॉट ठेवला आहे. कमीत कमी एक लॉट (Share Lot) खरेदी करावा लागेल. म्हणजेच 837 रुपये किंमत ठरली, तर कमीत कमी 14,076 रुपयांची गुंतवणूक (Investment) करावी लागेल.
First published:

Tags: Investment, Money, Savings and investments, Share market

पुढील बातम्या