जाहिरात
मराठी बातम्या / मनी / परत घेतली जातेय ही 20 रुपयाची नोट, तुमच्याकडे असेल तर बदलून मिळवा हजारो रुपये; वाचा काय आहे कारण

परत घेतली जातेय ही 20 रुपयाची नोट, तुमच्याकडे असेल तर बदलून मिळवा हजारो रुपये; वाचा काय आहे कारण

परत घेतली जातेय ही 20 रुपयाची नोट, तुमच्याकडे असेल तर बदलून मिळवा हजारो रुपये; वाचा काय आहे कारण

तुमच्याकडे देखील ही खास वीस रुपयाची नोट (20 rupees Note) असेल तर तुम्ही घरबसल्या चांगली कमाई (Earn Money) करू शकता. ही नोट एक्सचेंज (Note Exchange) करून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 जुलै: तुमच्याकडे देखील ही खास वीस रुपयाची नोट (20 rupees Note) असेल तर तुम्ही घरबसल्या चांगली कमाई (Earn Money) करू शकता. ही नोट एक्सचेंज (Note Exchange) करून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) 12 वेगवेगळ्या डिनॉमिनेशन्समध्ये भारतीय चलन नोटा जारी केल्या होत्या. यात 20 भारतीय रुपयांच्या नोटेचाही समावेश होता (यामध्ये तारीख श्रृंखला नाही आहे). नियमांनुसार, प्रत्येक नोटवर छपाईची तारीख आणि त्यातील वैधतेचे वर्ष असावे. योगायोगाने, बर्‍याच नोटांवर तारीख आणि वर्ष छापण्यात आलं नाही. अशा नोटा तुमच्याकडे असतील तर त्या बदलून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. आरबीआयने 2001 मध्ये 20 रुपयाची नोट जारी करण्यास सुरुवात केली होती, 2005 पासून त्या पुन्हा प्रचलनातून बंद करण्यात आल्या. या 20 रुपयाच्या बँक नोटेच्या मागे कोणतीही तारीख नाही आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की एक वैध 20 रुपयाच्या नोटेवर जारी करण्यात आलेलं वर्ष मागच्या बाजूला छापलेलं असणं आवश्यक आहे. दरम्यान तारखा नसणाऱ्या या नोटा तारखेसह तिच डिझाइन असणाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. हे वाचा- पोस्ट ऑफिसच्या PPF, SSY, NSC सह या 8 योजनांमध्ये पैसे होतील दुप्पट, वाचा सविस्तर या नोटा कुठे आणि कशा बदलाल? आता प्रश्न असा उपस्थित राहतो आहे की जर तुमच्याकडे विनातारखेची नोट असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही ही नोट रोख रकमेच्या स्वरुपात बदलून घेऊ शकता. याकरता तुम्हाला Leftovercurreny.com या साइटवर जावे लागेल. याठिकाणी ‘Add to Wallet’ या बटणावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल की तारखा नसणाऱ्या 20 रुपयाचा किती नोटा तुम्ही बदलणार आहात. तुम्ही जितक्या नोटा एक्सचेंज कराल तेवढे पैसे तुमच्या वॉलेटमध्ये अॅड होतील. ट्रान्झॅक्शनच्या पाच दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे मिळतील. (डिस्क्लेमर- ही बातमी वेबसाइटवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आलेली आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात