मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आजपासून Post Office च्या या नियमात होणार मोठा बदल, प्रत्येक रिक्वेस्टवर द्यावे लागणार 20 रुपये

आजपासून Post Office च्या या नियमात होणार मोठा बदल, प्रत्येक रिक्वेस्टवर द्यावे लागणार 20 रुपये

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (india post payments bank) आजपासून (1 ऑगस्ट) डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी देखील शुल्क आकारणार आहे. प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट आकारण्यात येणार आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (india post payments bank) आजपासून (1 ऑगस्ट) डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी देखील शुल्क आकारणार आहे. प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट आकारण्यात येणार आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (india post payments bank) आजपासून (1 ऑगस्ट) डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी देखील शुल्क आकारणार आहे. प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट आकारण्यात येणार आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, o1 ऑगस्ट: तुमचे देखील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत  (india post payments bank) खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजपासून बँक डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी देखील शुल्क आकारणार आहे.  याशिवाय बँकेने 1 जुलैपासून व्याजदरात देखील कपात केली आहे, त्यामुळे बँकेकडून मिळणारे काही फायदे देखील घटले आहेत. आयपीपीबीने याबाबत माहिती दिली आहे. सध्या डोअरस्टेप बँकिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही, मात्र 1 ऑगस्टपासून यामध्ये बदल होणार आहे.

किती द्यावं लागेल शुल्क?

1 ऑगस्टपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट आकारण्यात येणार आहेत. आतापर्यंत या सेवेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं.

व्याजदरातंही कपात

बँकेने अलीकडेच व्याजदरातही कपात केली होती. 1 जुलैपासून IPPB मध्ये बचत खातं उघडणाऱ्यांना कमी दराने व्याज मिळणार आहे. IPPB च्या ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या बॅलन्सवर सुरुवातीला 2.75 टक्के दराने व्याज मिळत असे. यामध्ये आता 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती. त्यानंतर व्याजदर 2.50 टक्के झाला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी ग्राहकांना 2.5 टक्के दराने व्याज मिळेल.

ऑनलाइन तपासता येईल ही माहिती

ग्राहकांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या app च्या माध्यमातून बॅलन्स तपासण्याची, पैसे ट्रान्सफर करण्याची आणि कोणत्याही आर्थिक व्यवकार करण्याची सुविधा देत आहे. बँक ग्राहकांना क्यूआर कार्डची देखील सुविधा देत आहे. खातेधारकाची ऑथेंटिकेशन प्रोसेस बायोमेट्रिकच्या साहाय्याने पूर्ण करता येईल.

हे वाचा-SBI Home Loan Offer: बँकेची मान्सून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीमध्ये जबरदस्त सूट

आयपीपीबी मध्ये ऑनलाइन बँक खाते उघडण्याची प्रक्रिया

1. गुगल प्ले स्टोअरवरून आयपीपीबीचे App डाऊनलोड करा

2. त्याठिकाणी देण्यात आलेल्या ओपन युअर अकाऊंट नाऊ (Open Your Account Now) वर क्लिक करा.

3. त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाका

4. याठिकाणी तुमच्या पॅन क्रमांकाची आणि आधार क्रमांकाची गरज भासेल

5. त्याठिकाणी आधारवर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल

6. यानंतर काही वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावी लागेल- शैक्षणिक पात्रता, पत्ता, नॉमिनेशन इ.

7. सबमिट केल्यानंतर तुमचे अकाउंट उघडले जाइल आणि App च्या माध्यमातून ते वापरता येईल.

हे वाचा-वेळेपेक्षा अर्धा तास जास्त काम करावं लागलं तरी कंपनीला द्यावा लागणार ओव्हरटाइम

विद्यमान ग्राहकांनी आयपीपीबी अ‍ॅप कसे वापरावे

1. IPPB APP मध्ये जाऊम तुम्हाला अकाऊंट नंबर, कस्टमर आयडी, जन्मतारिख आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.

2. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल

3. त्यानंतर MPIN सेट करून ओटीपी टाकावा लागेल. अशाप्रकारे विद्यमान ग्राहकांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल

First published:

Tags: Post office, Post office bank, Post office money