नवी दिल्ली, 14 जुलै: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI ने त्यांच्या 44 कोटी ग्राहकांसाठी हा अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने ग्राहकांना फ्री गिफ्टच्या नावाखाली होणाऱ्या फ्रॉड संदर्भात सावध केले आहे. बँकेने एक ट्वीट करत त्यांच्या ग्राहकांना सूचना दिली आहे. बँकेने या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की हे फसवणूक करणारे फ्री गिफ्टच्या नावाखाली कस्टमर्सना लिंक पाठवतात, आणि त्याद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती लंपास करतात. SBI ने काय केलं आहे ट्वीट? SBI ने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, तुमच्याही इनबॉक्समध्ये अशाप्रकारे लिंक्स येत आहेत का? तर या फिशिंग लिंक करण्यापासून सावध व्हा, यावर क्लिक केल्याने तुमची वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती चोरी होऊ शकते. सावध राहा आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.
Are you receiving these links in your inbox? Steer Clear! Clicking on these phishing links could lead to loss of your personal and confidential information. Stay alert. Think before you click!#ThinkBeforeYouClick #StayAlert #StaySafe #CyberSafety pic.twitter.com/S9WnN4wsGu
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 13, 2021
SBI च्या या सूचनांचं करा पालन याआधीही वेळोवेळी एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना सावधानता बाळगण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. काय आहेत या सूचना- -तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग युजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इ. बाबी कुठेही शेअर करू नका -एसबीआय, आरबीआय, सरकारी कार्यालय, पोलीस केवायसी इ. संबंधित अधिकारी म्हणून कॉल करणाऱ्यांपासून सावध राहा. -एखादा कॉल किंवा इमेलद्वारे आलेल्या Unknown Source असणाऱ्या मोबाइल अॅप डाउनलोड करू नका हे वाचा- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मोदी सरकारने DA मध्ये केली एवढी वाढ -ज्याचा स्रोत माहित नाही अर्थात जे Unknown Source वरून आले आहेत, अशा मेलमधील Attachments वर क्लिक करू नका -सोशल मीडिया किंव फोनवरुन मिळणाऱ्या शिवाय कोणत्याही फेक ऑफर्सपासून सावध राहा -बँकेने वेळोवेळी याबाबतही सूचना दिल्या आहेत की तुमचं बँक खातं क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्डचा नंबर इ. चा फोटो काढून ठेवला असेल तर ते देखील धोकादायक आहे. ही माहिती लीक होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमचं बँक खातं क्षणार्धात रिकामं होऊ शकतं.