मराठी बातम्या /बातम्या /मनी /यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर

यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर

LIC, Byju सह शेकडो कंपन्या 1.50 लाख कोटींहून अधिक निधी उभारतील असा अंदाज आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदार अपेक्षा करू शकतात की 2022, IPO च्या बाबतीत, 2021 पेक्षा अधिक चांगले असू शकते.

LIC, Byju सह शेकडो कंपन्या 1.50 लाख कोटींहून अधिक निधी उभारतील असा अंदाज आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदार अपेक्षा करू शकतात की 2022, IPO च्या बाबतीत, 2021 पेक्षा अधिक चांगले असू शकते.

LIC, Byju सह शेकडो कंपन्या 1.50 लाख कोटींहून अधिक निधी उभारतील असा अंदाज आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदार अपेक्षा करू शकतात की 2022, IPO च्या बाबतीत, 2021 पेक्षा अधिक चांगले असू शकते.

मुंबई, 28 डिसेंबर : यंदाचं 2021 हे वर्ष IPO (Initial Public Offer)साठी अनेक अर्थांनी स्मरणीय ठरले. एकीकडे कंपन्यांनी विक्रमी संख्येत आलेल्या IPO मधून विक्रमी निधी उभारला, तर दुसरीकडे गुंतवणूकदारांनी (Investors) भरघोस नफाही कमावला. जसजशी वर्षे सरत गेली तसतसे शेवटच्या महिन्यांत मोठ्या प्रमाणात IPO आले. जर तुम्ही देखील 2021 मध्ये IPO मध्ये गुंतवणूक आणि पैसे कमावण्यास चुकले असाल, तर 2022 मध्ये देखील तुमच्यासाठी असंख्य संधी असतील.

यावर्षी देखील LIC, Byju सह शेकडो कंपन्या 1.50 लाख कोटींहून अधिक निधी उभारतील असा अंदाज आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदार अपेक्षा करू शकतात की 2022, IPO च्या बाबतीत, 2021 पेक्षा अधिक चांगले असू शकते. नवीन वर्षात येणार्‍या काही मोठ्या IPO ची चर्चा करूया ज्यातून गुंतवणूकदार पैसे कमवू शकतात.

Income Tax ची तुमच्यावर नजर, रोखीने केले असतील 'हे' व्यवहार तर येईल नोटीस; वाचा नियम

LIC 

LIC चा बहुप्रतिक्षित IPO नवीन वर्षात येणार आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. याद्वारे सरकार LIC मधील 5 ते 10 टक्के स्टेक विकू शकते. एलआयसीचे मूल्यांकन 10 ट्रिलियन म्हणजेच 10 लाख कोटी रुपये (133 अब्ज डॉलर) असावे अशी सरकारची इच्छा आहे. हा एक स्थानिक विक्रम तसेच जगातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी लिस्टिंग असेल.

या आर्थिक वर्षात (FY22) LIC IPO येणार नसल्याच्या बातम्यांचे सरकारने खंडन केले आणि यासंदर्भात योजना पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (DIPAM) यांनी ट्वीट केले की, “एलआयसी या आर्थिक वर्षात आयपीओ आणू शकणार नाही अशी अटकळ खरी नाही. एलआयसीची आयपीओ योजना या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत तयार आहे आणि ती योग्य दिशेने वाटचाल करत आहे. याचा अर्थ हा IPO पुढील वर्षी एप्रिलपूर्वी येऊ शकतो.

MTNL च्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट; काय आहे कारण? तज्ज्ञांच्या मते अजूनही गुंतवणुकीची संधी

BYJU'S

BYJU'S देखील भारतातील सर्वात वेगाने वाढणारी स्टार्ट-अप कंपन्यांपैकी एक आहे, जी IP द्वारे 4500 कोटी रुपयांपर्यंत भांडवल उभारू शकते. ही कंपनी पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत SEBI कडे ड्राफ्ट पेपर दाखल करू शकते. अहवालानुसार, बँकर्स त्याचे मूल्यांकन 40 अब्ज डॉलर ते 50 अब्ज डॉलरपर्यंत ठेवू शकतात. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग आणि दिग्गज गुंतवणूक कंपन्यांनी या एज्युकेशन स्टार्ट अपमध्ये पैसे गुंतवले आहेत. त्याच्या बँकर्समध्ये मॉर्गन स्टॅनली, सिटीग्रुप आणि जेपी मॉर्गन यांचा समावेश आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांत मोठमोठे अधिग्रहण करून आपले स्थान मजबूत केले आहे.

OLA

बंगळुरू येथील ही राइडिंग एकूण 7 ते 14 हजार कोटींचे भांडवल उभारण्यासाठी IPO मार्केटमध्ये प्रवेश करेल. इतर स्टार्ट-अप्सच्या विपरीत, ओला फायदेशीर आहे. कंपनीला आर्थिक वर्षात 898 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. अलीकडेच, ओलाने प्री-आयपीओ राऊंडमध्ये 3500 कोटी रुपये उभे केले आहेत. अलीकडेच या कंपनीने GeoSpoc चे अधिग्रहण जाहीर केले आहे. याद्वारे ओलाला जागतिक दर्जाचे लोकेशन तंत्रज्ञान तयार करायचे आहे.

केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी 'ही' कामं करुन घ्या; काय आहे योजना?

Delhivery

या लॉजिस्टिक कंपनीचा आयपीओही पुढील वर्षी येणार आहे. ही कंपनी 3500 कोटी रुपयांचा IPO देखील आणू शकते. त्यासाठी त्यांनी सेबीमध्ये ड्राफ्ट पेपर्स दाखल केले आहेत. या IPO द्वारे 7.6 अब्ज फ्रेशन शेअर्स जारी करण्यात आले आहेत. ऑफर फॉर सेल 24 अब्ज रुपयांपेक्षा जास्त असेल, तर या कंपनीने अलीकडेच आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीतील 100 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा करार केला आहे.

First published:
top videos

    Tags: Money, Share market