मुंबई, 28 डिसेंबर : महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे (MTNL) शेअर आज 7 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. सकाळच्या ट्रेडिंग सत्रात या शेअरमध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट (Upper Circuit) पाहायला मिळाला आहे. गेल्या 1 महिन्यापासून एमटीएनएलच्या शेअर्समध्ये (MTNL share increased) वाढ होत आहे. गेल्या 1 महिन्यात हा स्टॉक 18 रुपयांवरून 38.45 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत शेअर 120 टक्क्यांनी वधारला आहे. मात्र बाजार निरीक्षकांचे म्हणणे आहे की स्टॉक आणखी वाढेल कारण कंपनी निधी उभारण्यासाठी आपली मालमत्ता विकण्याचा विचार करत आहे.
Profitmart Securities चे अविनाश गोरक्षकर म्हणतात की MTNL पैसे उभारण्यासाठी आपली मालमत्ता विकण्याची तयारी करत असल्याची चर्चा बाजारात आहे. या बातमीमुळे हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशाप्रकारे जमा होणारा पैसा कंपनीचे कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाणार असल्याचेही वृत्त आहे.
केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी 'ही' कामं करुन घ्या; काय आहे योजना?
SMC Global Securitas चे सौरभ जैन म्हणतात की ही सरकारी टेलिकॉम कंपनी (Government Telecom Company) 18000 कोटी रुपयांच्या तोट्यात आहे आणि सध्या तिच्यावर सुमारे 25 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीचे एकूण देणेदारी सुमारे 45000 कोटी रुपये आहे. जर आपण MTNL चे मार्केट कॅप बघितले तर ते सुमारे 2453 कोटी रुपये आहे. ते पुढे म्हणाले की, कंपनीने आपली मालमत्ता विकण्याची तयारी दाखवल्याच्या बातमीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे.
DIPAM वेबसाइटवर अपलोड केलेल्या दस्तऐवजानुसार, सरकारने MTNL आणि BSNL च्या रिअल इस्टेट मालमत्ता 970 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर विक्रीसाठी लिस्ट केल्या आहेत. BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी के पुरवार यांनी PTI शी बोलताना सांगितले की, MTNL आणि BSNL ची मालमत्ता विकण्याचे हे पहिले पाऊल आहे. बीएसएनएलच्या 660 कोटी रुपयांच्या आणि एमटीएनएलच्या 310 कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी बोली मागवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया आम्हाला दीड महिन्यात पूर्ण करायची आहे.
31 डिसेंबरआधी 'हे' काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट
MTNL च्या शेअर्सवर बोलताना, चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया म्हणतात की एमटीएनएलच्या शेअर्सने 38 रुपयांचा ब्रेकआउट दिला आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये तो शेअर 50 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हा स्टॉक सध्याच्या पातळीवर खरेदी केला जाऊ शकतो आणि 30 रुपयांच्या स्टॉप लॉससह 50 रुपयांचे टार्गेट ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market