जाहिरात
मराठी बातम्या / मनी / केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी 'ही' कामं करुन घ्या; काय आहे योजना?

केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी 'ही' कामं करुन घ्या; काय आहे योजना?

केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी 'ही' कामं करुन घ्या; काय आहे योजना?

पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत (pm svanidhi scheme), सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना 10,000 रुपयांचे संपूर्ण कर्ज देत आहे आणि हे कर्ज घेण्यासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही. याशिवाय जर तुम्ही या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला सबसिडीचा लाभही मिळेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 डिसेंबर : केंद्र सरकार (Central Government) अनेक प्रकारच्या जनहिताच्या योजना राबवत आहे. या अंतर्गत समाजातील विविध घटकांना सर्व प्रकारच्या सुविधा व आर्थिक मदत दिली जात आहे. यात केंद्र सरकारची पीएम स्वानिधी योजना (PM Svanidhi Yojna) आहे. या योजनेतील पात्र लोकांना सरकारकडून पूर्ण 10,000 रुपये मिळू शकतात. चला तर या योजनेबद्दल (Government Scheme) सविस्तर माहिती घेऊयात. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना 10,000 रुपयांचे संपूर्ण कर्ज देत आहे आणि हे कर्ज घेण्यासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही. याशिवाय जर तुम्ही या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला सबसिडीचा लाभही मिळेल. योजनेचा लाभ कुणाला मिळणार? या योजनेचा लाभ न्हावी दुकान, मोची, पान शॉप, धोबी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, चहाचे स्टॉल किंवा किऑस्क, ब्रेड पकोडे किंवा अंडी विक्रेते, फेरीवाले, स्टेशनरी विक्रेते यांना योजनेचा लाभ घेता येईल. 31 डिसेंबरआधी ‘हे’ काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट कर्जाशी संबंधित खास गोष्टी » सर्वप्रथम, कर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. » हे कर्ज 24 मार्च 2020 पूर्वी किंवा त्यापूर्वी अशा कामात गुंतलेल्या लोकांनाच मिळेल. > > या कर्जाचा कालावधी फक्त मार्च 2022 पर्यंत आहे, त्यामुळे ज्यांना याची गरज आहे त्यांनी त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. » रस्त्यावरील विक्रेते मग ते शहरी असो वा निमशहरी, ग्रामीण, त्यांना हे कर्ज मिळू शकते. » या कर्जाच्या व्याजावर सबसिडी उपलब्ध आहे, ती थेट कर्जदाराच्या खात्यात तिमाही आधारावर हस्तांतरित केली जाते. मोफत कर्जाची हमी या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना एका वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळू शकते. याचा अर्थ कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागणार नाही. याशिवाय, तुम्ही मासिक हप्त्यांमध्ये कर्ज भरू शकता. WhatsApp देणार नजीकच्या स्टोअर्स, रेस्टॉरंट्सची माहिती; कसं आहे नवीन फीचर? तुम्हाला किती सबसिडी मिळते? जर विक्रेत्याने पीएम स्वानिधी योजनेत मिळालेल्या कर्जाची नियमित परतफेड केली तर त्याला वार्षिक 7 टक्के व्याज अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. व्याज अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तिमाही आधारावर पाठवली जाईल. तुम्ही कर्ज वेळेवर भरल्यास, तुमची सबसिडी तुमच्या खात्यात जमा होईल. अधिकृत लिंक कर्जाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या लिंकला भेट देऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात