जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 8 कोटी महिलांना 3 महिन्यासाठी मिळणार मोफत सिलेंडर, केंद्र सरकारची मोठी घोषणा

8 कोटी महिलांना 3 महिन्यासाठी मिळणार मोफत सिलेंडर, केंद्र सरकारची मोठी घोषणा

8 कोटी महिलांना 3 महिन्यासाठी मिळणार मोफत सिलेंडर, केंद्र सरकारची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) 3 महिन्यांसाठी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 मार्च : कोरोनामुळे (Corornavirus) संपूर्ण देशामध्ये तणावाचं वातावरण आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने काही योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) 3 महिन्यांसाठी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे 8 कोटी महिलांना फायदा होणार आहे. 8 कोटी बीपीएल परिवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामुळे या परिवारांना एकूण 40 कोटींचा फायदा होणार आहे. काय आहे योजना? उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना एक स्टोव्ह आणि एलपीजी गॅस देण्यात येतो. याची किंमत 3,200 रुपये असते आणि यातील 1,600 रुपयांची सबसिडी सरकार देते. तर बाकी 1600 रुपये तेल कंपन्या ग्राहकांना लोनच्या स्वरुपात देतात. याचं पेमेंट ग्राहकांना ईएमआयच्या स्वरूपात करावे लागते. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये बँकाची काम सुरूच,महत्त्वाचं काम असेल तर जाणून घ्या बदललेल्या वेळा ) 14.2 किलोच्या सिलेंडरची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पहिल्या 6 रिफिलवर कोणताही ईएमआय द्यावा लागणार नाही. सातव्या रिफिलपासून ईएमआय सुरू होतो. 5 किलोचा सिलेंडर खरेदी करणाऱ्याना 17 व्या रिफिलपासून ईएमआय द्यावा लागतो.  2011 च्या जनगणनेनुसार ज्या कुटुंबांचा समावेळ बीपीएल कॅटेगरीमध्ये होतो, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. कसं कराल अर्ज? PMUY साठी बीपीएल परिवारातील कोणतीही महिला अर्ज करू शकते. जवळच्या एलपीजी केंद्रामध्ये जाऊन KYC फॉर्म भरून याबाबत अर्ज करावा लागतो. हा दोन पानांचा फॉर्म, नाव, पत्ता, जनधन खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी माहिती द्यावी लागते. तुम्हाला 14.2 किलो किंवा 5 किलो यापैकी कोणता सिलेंडर हवा आहे, याची माहिती द्यावी लागते. या योजनेच्या वेबसाइटवरून किंवा जवळच्या एलपीजी केंद्रात जाऊन या योजनेचा फॉर्म सहज मिळवता येतो. योजनेसाठी लागणारी कागदपत्र -पंचायत अधिकारी किंवा नगरपालिका अध्यक्षांनी अधिकृत केलेले बीपीएल कार्ड -बीपीएल रेशन कार्ड -फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र) -पासपोर्ट साइझमधील फोटो -रेशन कार्डाची फोटोकॉपी -गॅजेटेड अधिकाऱ्यांकडून सत्यप्रत केलेले स्वघोषणा पत्र -LIC पॉलिसी, बँक स्टेटमेंट -BPL च्या यादीमध्ये नाव असण्याची प्रिंटआउट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात