Home /News /money /

लॉकडाऊनमध्ये SBI चे 90 टक्के एटीएम सुरू, वाचा पैसे काढताना कोणती खबरदारी घ्याल

लॉकडाऊनमध्ये SBI चे 90 टक्के एटीएम सुरू, वाचा पैसे काढताना कोणती खबरदारी घ्याल

गेल्या दोन दिवसांपासून SBI च्या सर्वाधिक शाखा कमी कालावधीसाठी खुल्या आहेत. त्याचप्रमाणे बँकेचे 90 टक्के एटीएम सुरू आहेत.

    नवी दिल्ली, 26 मार्च : देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) बुधवारपासून देशात लॉकडाऊन सुरू होईल अशी घोषणा केली होती. देशभरामध्ये संपूर्णपणे बंद पाळण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI State Bank of India) काम कमी प्रमाणात सुरू आहेत. मात्र एसबीआयचे ऑनलाइन आणि डिजिटल कारभार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. SBI च्या डिजिटल बँकिंगचे प्रमुख पी. के. गुप्ता यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, लॉकडाऊन दरम्यान राज्य आणि जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करून ठरवण्यात येईल की कोणत्या शाखा किती वेळ सुरू ठेवायच्या आहेत. (हे वाचा-'EMI आणि कर्जाच्या परतफेडीमध्ये सूट द्यावी', अर्थमंत्रालयाची RBI कडे मागणी) गुप्ता यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या बँकेच्या सर्वाधिक शाखा कमी कालावधीसाठी खुल्या आहेत. त्याचप्रमाणे बँकेचे 90 टक्के एटीएम सुरू आहेत. काही राज्यांमध्ये बँकेच्या शाखा सकाळी 7 ते 10, काही ठिकाणी सकाळी 8 ते 11 तर काही राज्यांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत या शाखा खुल्या आहेत. (हे वाचा-कोरोना लॉकडाऊनमुळे होणाऱ्या नुकसानाचा आकडा तुमच्या कल्पनेच्या पलीकडील!) सरकारकडून लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवांमध्ये बँकांचा समावेश असल्याने बँका खुल्या     ठेवणं बंधनकारक आहे. SBI एटीएम संदर्भात सुरक्षेसाठी काही टिप्स -बँकेच्या माहितीनुसार, जर एटीएममध्ये आधीपासूनच एखाद्या व्यक्ती उपस्थित असेल आणि तो एटीएमचा वापर करत असेल, तर आतमध्ये जाऊ नये -एटीएममध्ये जाण्याआधी सॅनिटायझरचा वापर करावा, ही गोष्ट कायम अंमलात आणावी -एटीएममधील वेगवेगळ्या जागांना स्पर्श करू नये (हे वाचा-बचत खात्यासंदर्भातील हा महत्त्वाचा नियम बदलला, आता राहा टेन्शन फ्री) -जर तुम्हाला ताप आला असेल, तर एटीएमध्ये जाणे टाळावे -खोकताना आणि शिंकताना रुमालाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. -एटीएमच्या रूममध्ये वापर केलेले टिशू फेकू नये -एसबीआयचे डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेज YONO, INB, BHIM SBI चा अधिकाधिक वापर करावा
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या