• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 3 स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, या शेअरने तर दिला 14850% चा रिटर्न

25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 3 स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, या शेअरने तर दिला 14850% चा रिटर्न

तुम्हाला देखील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पेनी स्टॉक (What is Penny stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. 25 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर: शेअर बाजारातील गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी (Investment in Share Market) फायदेशीर ठरते आहे. असे काही स्टॉक्स आहेत जे गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देत आहेत. तुम्हाला देखील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही  पेनी स्टॉक (What is Penny stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. 25 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात. हे स्टॉक खूप स्वस्त (Investment in Penny Stock) असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी आहे. या शेअर्सची किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी खूप आकर्षक ठरतात. मात्र या शेअर्समध्ये जोखीम तितकीच जास्त आहे. विविध गुंतवणुकीच्या पर्यायांकडे लक्ष दिल्यास दिग्गजांचा असाच सल्ला आहे की इक्विटी बाजारच लाँग टर्ममध्ये बेस्ट परफॉर्मर ठरेल. अशावेळी गेल्या एका वर्षातील गुंतवणुकीनुसार काही असे स्टॉक्स आहेत ज्यांनी या कालावधीमध्ये चांगला रिटर्न दिला आहे. हे वाचा-Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई 1. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स (Flomic Global Logistics): 14850% रिटर्न गेल्या 1 वर्षात या शेअरमध्ये 14850 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि या काळात या शेअरची किंमत 1 रुपयांवरून 167.45 रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र हा स्टॉक NSE वर सूचीबद्ध नाही आणि त्याचे मार्केट कॅप 120 कोटी रुपये आहे. ही एक IATA द्वारे संचालित एअरफ्रेट सेवा प्रदाता कंपनी आहे. कंपनी सागरी वाहतुकीसह हवाई, रेल्वे आणि इतर मार्गांनी मालाच्या वाहतुकीसाठी लॉजिस्टिक सुविधा पुरवते. कंपनी जवळजवळ 30 वर्षांपासून व्यवसायात आहे आणि 84 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा पुरवते. 2. गोपाला पॉलीप्लास्ट लिमिटेड: 10,903% परतावा 1 वर्षात हा स्टॉक 5.72 रुपयांवरून 629.4 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या स्टॉकने 10,903 टक्के परतावा दिला आहे. गोपाला पॉलीप्लास्ट लिमिटेड एचडीपीई/पीपीपासून विणलेल्या पोत्या किंवा पिशव्या तयार करते. त्याची स्थापित क्षमता 7925 टन आहे. याशिवाय कंपनी इतर कापड उत्पादनांसाठी लेबल्स बनवते. जे रेडिमेड कपडे, होजरी, टेरी टॉवेल, शूज आणि विणलेल्या कपड्यांमध्ये वापरले जातात. हे वाचा-उद्यापासून बंद होणार सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी ही सुविधा,या आहेत गाइडलाइन 3. Xpro इंडिया: रिटर्न 3145.54% वर गेल्या 1 वर्षात या शेअरमध्ये 3145.54 टक्के वाढ झाली आहे. त्याची लेटेस्ट क्लोजिंग किंमत 691.3 रुपये आहे. इलेक्ट्रिक वाहनांशी निगडीत प्रचंड क्षमता पाहता या स्टॉकमध्ये पुढे आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. ही बिर्ला ग्रुपची कंपनी आहे. त्याचे अनेक विभाग आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे युनिट्स आहेत. ही एक पॅकेजिंग व्यवसाय कंपनी आहे. ज्यांचे मार्केट कॅप 816 रुपये आहे. जर तुम्ही कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओवर नजर टाकली तर ती BOPP फिल्म्स, कोएक्स कास्ट फिल्म्स, कोएक्स शीट्स सारखी सर्व उत्पादने बनवते. (Disclaimer: बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कुणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: