PNB ने ट्विटरवरुन दिली माहिती पीएनबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे. ट्वीटवर बँकेने असे म्हटले आहे की, मेगा ई-लिलाव 26 नोव्हेंबर 2021 रोजी होईल. यात निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा लिलाव होईल. तुम्ही याठिकाणी वाजवी किंमतींत मालमत्ता खरेदी करू शकता. हे वाचा-IPO: 1 डिसेंबरपासून 3 दिवस आहे कमाईची संधी, गुंतवणुकीसाठी राहा तयार अधिक माहितीसाठी या लिंकवर करा क्लिक मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://ibapi.in/ या लिंकला भेट देऊ शकता. बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून लिलावासाठी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मालमत्तेचे फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड, स्थान, मोजमाप आणि इतर माहिती दिली जाते. जर तुम्हाला ई-ऑक्शनद्वारे मालमत्ता खरेदी करायची असेल, तर तुम्ही बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित मालमत्तेची कोणतीही माहिती मिळवू शकता.The best property in town is awaiting you.
Participate in PNB's Mega e-Auction to get reasonable prices for residential and commercial property. To know more, visit e-Bikray Portal: https://t.co/N1l10s1hyq#MegaEAuction pic.twitter.com/rKafhy5Slh — Punjab National Bank (@pnbindia) November 24, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.