मराठी बातम्या /बातम्या /मनी /Interesting Fact: 'या' कारणामुळे जगात झाला होता Cryptocurrency चा उदय; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Interesting Fact: 'या' कारणामुळे जगात झाला होता Cryptocurrency चा उदय; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

SBI नं काय म्हंटल जाणून घ्या

SBI नं काय म्हंटल जाणून घ्या

2008 मध्ये जगभरात उद्भवलेल्या आर्थिक संकटांनंतर एका आभासी चलनाचा म्हणजे क्रिप्टोकरन्सीचा उदय झाला.

  मुंबई, 26 नोव्हेंबर: सरकार क्रिप्टोकरन्सीवर (Cryptocurrency) बंदी घालण्यासाठी एक कायदा करणार असल्याच्या चर्चेने सध्या देशात जोर धरला आहे. येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक विधेयक (Bill) मांडलं जाणार आहे. त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून, यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत. सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार का? घातल्यास भारतातल्या क्रिप्टोकरन्सीचं भविष्य काय असेल, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सी का निर्माण करण्यात आली, कोणी निर्माण केली असे प्रश्नही पुढे आले आहेत. अनेक जण याबाबत अनभिज्ञ आहेत. क्रिप्टोकरन्सी कशी चलनात आली आणि ते म्हणजे नेमकं काय, याबाबत माहिती देणारं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.

  क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल किंवा व्हर्च्युअल चलन (Digital Currency). आपण कोणतीही वस्तू खरेदी करायची असली तरी त्यासाठी पैसे देतो, ते नाणी किंवा नोटांच्या स्वरूपात असतात. विशिष्ट आकाराची, रंगरूपाची नाणी किंवा नोटेला ठराविक मूल्य असतं. नाणी किवा नोटांच्या स्वरूपातलं हे चलन प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक बाजारपेठेत आणते. आता भौतिक स्वरूपातल्या या चलनांचं आदानप्रदान डिजिटल पद्धतीने करता येतं. म्हणजे प्रत्यक्ष देवाणघेवाण करण्याऐवजी या चलनाचे व्यवहार माहिती-तंत्रज्ञानाच्या साह्याने निर्माण केलेल्या सुविधेद्वारे थेट बँक खात्यातून केले जातात. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत चलनाचं महत्त्व अनन्यसाधारण असतं; मात्र 2008 मध्ये जगभरात उद्भवलेल्या आर्थिक संकटांनंतर एका आभासी चलनाचा म्हणजे क्रिप्टोकरन्सीचा उदय झाला.

  जगाला लुटून फरार झालीये ही Cryptocurrency क्वीन! गुंतवणूक करण्याआधी घ्या जाणून

  जगातली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइन (Bitcoin). ही जगातली सर्वांत जुनी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइन ही अनेक गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. बिटकॉइननं गेल्या अनेक वर्षांतल्या आपल्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आहे. आज जगभरात अनेक क्रिप्टोकरन्सीज असल्या, तरी बिटकॉइनची जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही. हे डिजिटल चलन 2008 मध्ये तयार करण्यात आलं होतं. 2009 मध्ये हे सॉफ्टवेअर प्रसिद्ध झालं आणि बिटकॉइन नेटवर्क सुरू झाले. आज हे सॉफ्टवेअर सर्वांसाठी खुले आहे. ते कोणीही पाहू शकतं किंवा त्यात योगदान देऊ शकतं.

  जपानमधली (Japan) एक व्यक्ती किंवा एका गटाने बिटकॉइन तयार केल्याचं मानलं जातं. त्याला सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) म्हणून ओळखलं जातं. 2008 मध्ये इंटरनेटवर अॅकॅडेमिक व्हाइट पेपर अपलोड (Academic White Paper) करण्यात आला. त्याचं शीर्षक होतं 'बिटकॉइन : पीअर-टू-पीअर इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टीम.' त्यात हे डिजिटल चलन असल्याचं सांगण्यात आलं होतं. यावर कोणत्याही सरकारचं नियंत्रण राहणार नाही किंवा सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असं सांगण्यात आलं होतं. बिटकॉइन्स मागणी आणि पुरवठा, क्रिप्टोग्राफी आणि विकेंद्रीकृत नेटवर्क अशा तीन तत्त्वांवर काम करतं. बिटकॉइन चलन ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर (Blockchain Technology) कार्य करतं. मॅसिव्ह कम्प्युटिंग सिस्टीमद्वारे किंवा मायनिंगद्वारे हे चलन मिळवलं जातं. ही अत्यंत तांत्रिक प्रक्रिया असून, त्यासाठी इंटरनेटसह वीजपुरवठा आवश्यक आहे. बिटकॉइन्स केवळ मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यानं त्याचं मूल्य उच्च आहे. हे डिजिटल चलन आता वस्तू खरेदी-विक्रीसाठी, तसंच सेवांसाठी मूल्य देण्यासाठीदेखील वापरलं जातं. आता अनेक कंपन्यांनी बिटकॉइनमध्ये पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा वापर वाढला आहे.

  First published:

  Tags: Cryptocurrency, Money