• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Indian Railway: डिसेंबरपासून फेब्रुवारी 2022 पर्यंत महाराष्ट्रासह या राज्यांतील अनेक ट्रेन्स रद्द, इथे वाचा संपूर्ण यादी

Indian Railway: डिसेंबरपासून फेब्रुवारी 2022 पर्यंत महाराष्ट्रासह या राज्यांतील अनेक ट्रेन्स रद्द, इथे वाचा संपूर्ण यादी

indian railways

indian railways

पश्चिम रेल्वेने केलेल्या लेटेस्ट घोषणेनुसार, हिवाळ्याच्या हंगामात संचालनाच्या कारणास्तव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात दरम्यान सहा जोडी विशेष गाड्या रद्द (Indian Railway Cancelled train from December 2021 to February 2022) करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: भारतीय रेल्वेने (Indian Railways) सणासुदीच्या काळात अनेक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान जरी नवीन गाड्या विविध मार्गांवर धावणार असल्या तरी काही गाड्या रद्द देखील करण्यात येत आहे. याचा फटका सामान्यांना पुढील महिन्यापासून फेब्रुवारी 2022 पर्यंत बसणार आहे. सुमारे 668 विशेष गाड्या सुरू करणाऱ्या भारतीय रेल्वेने पुढील महिन्यापासून सहा जोडी गाड्या रद्द करण्याची योजना आखली आहे. पश्चिम रेल्वेने केलेल्या (Western Railway -WR) लेटेस्ट घोषणेनुसार, हिवाळ्याच्या हंगामात संचालनाच्या कारणास्तव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात दरम्यान सहा जोडी विशेष गाड्या रद्द (Indian Railway Cancelled train from December 2021 to February 2022) करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने काही गाड्या रद्द, तर काही डायव्हर्ट आणि काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्याची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेने 1 डिसेंबर ते 26 फेब्रुवारी 2022 या कालावधीत वांद्रे, अहमदाबाद, वलसाड, उज्जैन येथून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या 12 गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. ज्यांची संपूर्ण यादी तुम्ही येथे तपासू शकता. हे वाचा-'या' बँकेच्या ग्राहकांना झटका! 1 डिसेंबरपासून बचत खात्याबाबत होतोय बदल कोणत्या गाड्या रद्द >> ट्रेन क्रमांक 05068 : वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर वीकली स्पेशल ट्रेन, 3 डिसेंबर 2021 ते 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 05067 : गोरखपूर ते वांद्रे टर्मिनस वीकली स्पेशल ट्रेन, 1 डिसेंबर 2021 ते 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 09017 : वांद्रे टर्मिनस ते हरिद्वार, वीकली स्पेशल ट्रेन, 1 डिसेंबर 2021 ते 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 09018 : हरिद्वार-वांद्रे टर्मिनस, वीकली स्पेशल ट्रेन, 2 डिसेंबर 2021 ते 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 09403 : अहमदाबाद-सुलतानपूर, वीकली स्पेशल ट्रेन, 7 डिसेंबर 2021 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द हे वाचा-खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम >> ट्रेन क्रमांक 09404 : सुलतानपूर-अहमदाबाद, वीकली स्पेशल ट्रेन, 8 डिसेंबर 2021 ते 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 09407 : अहमदाबाद- वाराणसी, वीकली स्पेशल ट्रेन, 2 डिसेंबर 2021 ते 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 09408 : वाराणसी-अहमदाबाद, वीकली स्पेशल ट्रेन, 4 डिसेंबर 2021 ते 26 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 09111 : वलसाड-हरिद्वार, वीकली स्पेशल ट्रेन, 7 डिसेंबर 2021 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 09112 : हरिद्वार-वलसाड, वीकली स्पेशल ट्रेन, 8 डिसेंबर 2021 ते 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 04309 : उज्जैन-देहरादून, वीकली स्पेशल ट्रेन, 2 डिसेंबर 2021 ते 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द >> ट्रेन क्रमांक 04310 : देहरादून-उज्जैन वीकली स्पेशल ट्रेन, 1 डिसेंबर 2021 ते 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत रद्द
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: