मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' बँकेच्या ग्राहकांना झटका! 1 डिसेंबरपासून बचत खात्याबाबत होतोय बदल, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

'या' बँकेच्या ग्राहकांना झटका! 1 डिसेंबरपासून बचत खात्याबाबत होतोय बदल, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल (Alert for PNB customers) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. यामुळे ग्राहकांची बचत कमी होणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल (Alert for PNB customers) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. यामुळे ग्राहकांची बचत कमी होणार आहे. बँक तुमच्या बचत खात्यावरील व्याजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेत आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank Saving Account Interest Rate) 1 डिसेंबर 2021 पासून बचत खात्यावरील व्याजदर कमी करणार आहे.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, बचत खात्यावर (PNB Saving Account Interest Rate Update) मिळणारे वार्षिक व्याज 2.90 टक्क्यांवरुन 2.80 टक्के करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या या निर्णयामुळे जुन्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांवर परिणाम होणार आहे. शिवाय एनआरआय ग्राहकांवर देखील याचा परिणाम होणार आहे. याआधी पंजाब  नॅशनल बँकेने 1 सप्टेंबर रोजी बचत खात्यावरील व्याजदरात कपात करत ते 2.90 टक्के केले होते.

किती बॅलन्सवर किती मिळेल व्याज

पंजाब नॅशनल बँकेच्या मते, 1 डिसेंबर 2021 पासून बचत खात्यात 10 रुपयांपेक्षा कमी ठेव तुमच्या बचत खात्यात असेल तर तर त्यावर वार्षिक 2.80 टक्के दराने व्याज मिळेल. तर त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास व्याजदर 2.85 टक्के असणार आहे.

हे वाचा-एका महिन्यात होणार 25 लाख विवाह; 3 लाख कोटीहून अधिक उलाढालीची अपेक्षा- CAIT

एसबीआयने देखील कमी केले आहेत व्याजदर

देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया बचत खात्यावर 2.70 टक्के दराने वार्षक व्याजदर देऊ करते. एसबीआय एक लाख रुपयांपर्यंतचा डिपॉझिटवर 2.70 टक्के दराने व्याज देते

सरकारी बँकांमध्ये बचत खात्यावरील व्याजदर

आयडीबीआय बँक – 3 ते 3.25 टक्के

केनरा बँक – 2.90 ते  3.20 टक्के

बँक ऑफ बडोदा – 2.75 ते 3.20 टक्के

पंजाब अँड सिंध बँक – 3.10 टक्के

हे वाचा-आज पेट्रोल-डिझेल दरवाढीला लगाम लागला आहे का? काय आहे आजचा भाव

बचत खात्यावर खाजगी बँकांमध्ये मिळेल जास्त व्याजदर

एचडीएफसी बँक – 3 ते 3.5 टक्के

आयसीआयसीआई बँक – 3 ते 3.5 टक्के

कोटक महिंद्रा बँक – 3.5 टक्के

इंडसइंड बँक – 4 ते 5 टक्के

First published:

Tags: Pnb, Pnb bank