मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम

खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम

डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) पहिल्या जागतिक हॅकेथॉनचं (RBI 1st global Hackathon) आयोजन करणार आहे.

डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) पहिल्या जागतिक हॅकेथॉनचं (RBI 1st global Hackathon) आयोजन करणार आहे.

डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) पहिल्या जागतिक हॅकेथॉनचं (RBI 1st global Hackathon) आयोजन करणार आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर: सध्या मोबाइलद्वारे ऑनलाइन व्यवहार (Online Transactions) करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अगदी तळागाळापर्यंत डिजिटल पेमेंट (Digital Payment) सुविधा वापरली जात असल्याचं दिसत आहे. ग्रामीण भागामध्येही डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. जेवढा डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर वाढला आहे तेवढंच या पद्धतीची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) पहिल्या जागतिक हॅकेथॉनचं (RBI 1st global Hackathon) आयोजन करणार आहे.

ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट सुविधा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पहिल्या जागतिक हॅकेथॉनचं आयोजन करणार आहे. या हॅकेथॉनची घोषणा करताना आरबीआयने म्हटलं आहे, की डिजिटल पेमेंट अधिक कार्यक्षम बनवणं ही त्याची थीम आहे. ‘हार्बिंजर 2021’ (HARBINGER 2021) नावाच्या या हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी 15 नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होणार आहे.

हे वाचा-Gold price: सलग तिसऱ्या दिवशी उतरलं सोनं, तरीही सोन्याचे भाव 48 हजार रुपयांपार!

मिळेल 40 लाखांचे बक्षीस

हॅकेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्यांना ग्राहकांचा डिजिटल पेमेंट अनुभव सुलभ करणं आणि सुधारणं, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्याशी संबंधित समस्या ओळखणं आदींवर उपाय सुचवावे लागतील. 'हार्बिंजर 2021'मध्ये सहभाग घेणाऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची आणि आपले नावीन्यपूर्ण उपाय प्रदर्शित करण्याची संधी मिळेल, असं आरबीआयने एका निवेदनात म्हटलं आहे. तसंच यामध्ये एक ज्युरी प्रत्येक श्रेणीतल्या विजेत्यांची निवड करणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला 40 लाख रुपये, तर दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला 20 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.

कोरोना काळात पैशांची प्रत्यक्ष देवाणघेवाण करण्यापेक्षा डिजिटल पेमेंटवर भर देण्याचं प्रमाण वाढलं आहे. स्मार्टफोन वापरण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा डिजिटल पेमेंट सुविधा वापरली जाऊ लागली आहे. त्यामुळे आरबीआयकडून आयोजित केल्या गेलेल्या हॅकेथॉनचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

हे वाचा-एका महिन्यात होणार 25 लाख विवाह; 3 लाख कोटीहून अधिक उलाढालीची अपेक्षा- CAIT

नवी स्मॉल बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचं कामकाज 1 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. देशात आधीच अनेक लघु वित्त बँका आहेत. यामध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, जन स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, ए यू स्मॉल फायनान्स बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. सुमारे 6 वर्षांच्या कालावधीनंतर नवीन बँक परवाना जारी करण्यात आला आहे.

चालू खात्यांबाबतचे नियम

यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू बँक खात्यांबाबतचे त्यांचे नियम शिथिल केले आहेत. या संदर्भात, त्यांनी सर्वांत प्रथम ऑगस्ट 2020 मध्ये मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. ही मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपत होती. ती एका महिन्यासाठी म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ज्या कर्जदारांचं एक्सपोजर 50 कोटीपेक्षा कमी आहे, ते ग्राहक चालू खातं, रोख क्रेडिट खातं आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरू शकतात; मात्र अशा कर्जदारांनी 5 कोटींची मर्यादा ओलांडल्यास त्यांना बँकेत कळवावं लागेल.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news