नवी दिल्ली, 25 मे : वाहतुकीचे मुख्य साधन असल्याने अनेकदा ट्रेनमध्ये जागांवरून भांडणे होतात. कारण असे अनेक रुट आहेत जिथे लोक जास्त आहेत आणि ट्रेनची संख्या खूप कमी आहे. यात ज्या लोकांना ट्रेनचे नियम माहिती नाही त्यांना तर जास्तच त्रास सहन करावा लागतो. ट्रेनच्या प्रत्येक श्रेणीसाठी सुविधा, भाडे आणि तिकीट बुक करण्याचे नियम वेगळे आहेत. नियम माहिती असलेले प्रवासी प्रवासाच्या खूप आधी तिकीट बुक करतात आणि अडचणीतून वाचतात. त्याचबरोबर काहीजण प्रवासापूर्वी तिकीट काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना अनेक वेळा कन्फर्म तिकीट मिळत नाही. म्हणूनच ट्रेन सुटण्याच्या किती दिवस आधी तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही तुमची ट्रेन सुटण्याच्या चार महिने आधी तुमची सीट रिझर्व्ह करू शकता. भारतीय रेल्वेच्या तिकीट नियमांनुसार, प्रवासाच्या तारखेच्या 120 दिवस आधी तिकीट बुक करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध आहे. दुसरीकडे, तुम्ही प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी तत्काळ ट्रेनची तिकिटे बुक करू शकता. 3 एसी आणि त्याहून वरच्या वर्गासाठी बुकिंग दररोज सकाळी 10.00 वाजता सुरू होते. स्लीपर तत्काळ तिकीट बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते. प्रवासाच्या दिवशीच प्रवासी UTS अॅपद्वारे अनारक्षित रेल्वे तिकीट बुक करू शकतात.
ट्रेनमध्ये काही निळे तर काही लाल रंगाचे कोच का असतात? दोघांत काय फरक?
जनरल तिकीट खरेदीसाठी दोन नियम आहेत. तुम्हाला कोणत्याही ट्रेनच्या जनरल डब्यात 199 किलोमीटरपर्यंत प्रवास करायचा असेल तर तुम्हाला त्याच दिवशी तिकीट खरेदी करावे लागेल. याचे कारण म्हणजे 199 पर्यंतच्या प्रवासासाठी घेतलेले जनरल तिकीट केवळ 3 तासांसाठी वैध आहे. जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर 3 तासांच्या आत ट्रेनमध्ये चढावे लागते. मात्र 200 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी 3 दिवस आधी जनरल तिकीट काढता येईल.
IRCTC ने आणलंय खास 'डिवाइन हिमालयन टूर', स्वस्तात मस्त आहे पॅकेज!
एक काळ असा होता की रेल्वे तिकीट काढण्यासाठी एजंटांकडे जावं लागतं होतं. रेल्वे तिकीट काउंटरबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावं लागत होतं. पण आता तसं राहिलं नाहीये. भारतीय रेल्वे आता हायटेक झालीये. आता रेल्वे प्रवासी अगदी सहज घरी बसून तिकीट बुक करू शकतात. भारतीय रेल्वे अॅप्स आणि वेबसाइट्सद्वारे प्रवासी आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे ऑनलाइन बुक करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Railway, Railways, Train