मुंबई, 24 मे : IRCTC ने पर्यटकांसाठी डिवाइन हिमालय टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटकांना वैष्णोदेवीपासून पालमपूरपर्यंत अनेक मंदिरे आणि हिल स्टेशनला भेट देता येणार आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनमधून प्रवास करतील. IRCTC चे हे टूर पॅकेज 7 रात्री आणि 8 दिवसांचे आहे. 'देखो अपना देश' अंतर्गत या टूर पॅकेजचा प्रवास असेल. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
IRCTC चं हे टूर पॅकेज 28 मे पासून सुरू होणार आहे. हे टूर पॅकेज दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून सुरू होईल. या टूर पॅकेजमध्ये प्रवासी मॅक्लिओडगंजपासून ज्वाला देवी आणि पालमपूरपर्यंत अनेक ठिकाणी भेट देतील. रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रवासी आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज बुक करू शकतात. यासोबतच रेल्वेने दिलेल्या नंबरवर कॉल करून टूर पॅकेजचे बुकिंगही करता येईल.
खिशात प्लॅटफॉर्मचं तिकीट असुनही लागेल पेनल्टी, बचावासाठी जाणून घ्या हा कायदा
या टूर पॅकेजमध्ये पर्यटक मसरूर, कांगडा, पालमपूर, चामुंडा देवी, धर्मशाला, मॅक्लॉडगंज, ज्वाला देवी, चिंतापूर्णी, कटरा आदी ठिकाणांना भेट देतील. टूर पॅकेजमध्ये, ट्रेन हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि प्रवासी सोनीपत, कर्नाल, कुरुक्षेत्र आणि अंबाला येथून चढू आणि उतरू शकतील. हे टूर पॅकेज 4 जून रोजी संपणार आहे.
स्वस्तात मस्त फ्रीज खरेदी करायचंय? येथे सुरु आहे बंपर ऑफर, उशीर करु नका
IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये, जर तुम्ही AC2 टियरमध्ये सिंगल प्रवास करत असाल तर तुम्हाला 58,950 रुपये भाडे द्यावे लागेल. त्याच वेळी, तुम्हाला दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी 52,200 रुपये आणि तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी 51,500 रुपये भाडे द्यावे लागेल. लहान मुलांसाठी बेडची सुविधा हवी असल्यास 47200 रुपये मोजावे लागतील. यासोबच AC-1 केबिनमधील एका प्रवासासाठी, तुम्हाला प्रति व्यक्ती 61,950 रुपये भाडे द्यावे लागेल. दोन लोकांसोबत प्रवास केल्यास 55200 रुपये भाडे द्यावे लागेल. त्याच वेळी, तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी तुम्हाला 54450 रुपये भाडे द्यावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.