जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Indian railway : वंदे भारत आणि मिनी वंदे भारतमध्ये फरक काय? कोणत्या रुटवर चालतेय ही छोटी ट्रेन?

Indian railway : वंदे भारत आणि मिनी वंदे भारतमध्ये फरक काय? कोणत्या रुटवर चालतेय ही छोटी ट्रेन?

मिनी वंदे भारत

मिनी वंदे भारत

Indian railway : देशात सध्या प्रत्येक राज्यासाठी वंदे भारत ट्रेन चालवली जातेय. गेल्या काही दिवसात वंदे भारत ट्रेन वेगळ्या रंगात दिसली. नवीन वंदे भारत ट्रेनचा रंग ऑरेंज कलरच्या तिरंग्याशी प्रेरित आहे. अशा प्रकारे देशात अनेक ठिकाणी 8 रँकची मिनी वंदे भारत ट्रेनही चालवली जातेय. चला याविषयी जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Mini Vande Bharat Express : आपल्या देशात विविध ट्रेन चालवल्या जातात. यामध्ये वंदे भारत ट्रेन ही लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे. तर दुसरीकडे लवकरच अनेक रुटवर मिनी वंदे भारत देखील दिसणार आहे. म्हणजेच येत्या काळात तुम्ही 8 डब्ब्यांच्या वंदे भारत ट्रेनही पाहू शकला. असं म्हटलं जातंय की, वंदे भारत ट्रेन देशाच्या मध्यम वर्गाच्या सुविधांसाठी महत्त्वाची असणार आहे. भारतीय रेल्वे दिल्ली-चंदीगढ, चेन्नई-तिरुनेलवेली, लखनऊ-प्रयागराज आणि ग्वालियर-भोपाळसहित अनेक मार्गांवर सहज 8 कोचच्या वंदे भारत ट्रेनसाठी चार नवीन रुट सुरु करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोधपूर ते साबरमतीपर्यंत मिनी वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनची विशेष गोष्ट म्हणजे देशातील सर्वात लहान वंदे भारत ट्रेनमध्ये तिचा समावेश आहे. म्हणजे जयपूरसह इतर राज्यात धावणाऱ्या वंदेला भारत ट्रेनला 16 डबे आहेत. मात्र या ट्रेनला फक्त 8 कोच असणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशभरात 25 वंदे भारत ट्रेन धावत आहेत, त्यापैकी 9 ट्रेनला 8 डबे आहेत. चार नवीन आठ डब्यांच्या वंदे भारत ट्रेन जोडल्या गेल्याने देशभरात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची एकूण संख्या 29 होईल. Indian Railway : रोज रात्री 45 मिनिटांसाठी बंद होते तिकीट बुकिंग, अवश्य जाणून घ्या वेळ मिनी वंदे भारतची खासियत मिनी वंदे भारतमध्ये दोन कॅटेगिरी असतील. ज्यामध्ये चेयर कार आणि एग्जीक्यूटिव्ह क्लास असेल. एग्जीक्यूटिव्ह क्लासचं भाडं चेयर कारपेक्षा जास्त असेल. 8 कोचच्या या ट्रेनमध्ये सात एसी चेयर कार आणि एक एक्जक्यूटिव्ह क्लास असेल. यामध्ये 556 प्रवाशांना बसण्याची क्षमता असेल. तसंच ट्रेनमध्ये केटरिंगची सुविधाही उपलब्ध आहे. म्हणजेच प्रवासी जेवणही ऑर्डर करतील तर त्याचा चार्ज फेयर चार्जमध्ये अॅड होईल. Indian Railway : रेल्वेत फर्स्ट क्लास तिकीट का असतं एवढं महाग? कोणत्या स्पेशल सुविधा मिळतात? घ्या जाणून स्पीड किती असेल? सध्या वंदे भारत जोधपूर ते साबरमतीचा सरासरी वेग ताशी 80 KM आहे. ही ट्रेन ताशी 160 किमी वेगाने धावू शकते. दोन डब्यांच्या मध्यभागी वेस्टिब्युल्स आहेत. यामुळे आवाजावर नियंत्रण राहील. पॅन्ट्रीमधून जेवणाचीही सोय असेल. ट्रेनचा पुढचा भाग एरोडायनामिक आकारात आहे जो हायस्पीडसाठी आहे. रेल्वेने केली भाडे कपात या चार नवीन वंदे भारत ट्रेनची सुरुवात अशा वेळी झाली आहेत जेव्हा रेल्वे भाडे कपात करून आपल्या गाड्यांची क्षमता वाढवत आहे. रेल्वेनेही भाड्यात 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ही कपात फक्त  वंदे भारत ट्रेनसाठीच नाही, तर ज्या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहेत अशा सर्व ट्रेन्ससाठी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात