Home /News /money /

ऑनलाईन रेल्वे तिकीट काढण्याआधी हे वाचा! IRCTC ने दिलाय ऑनलाईन फ्रॉडचा Alert

ऑनलाईन रेल्वे तिकीट काढण्याआधी हे वाचा! IRCTC ने दिलाय ऑनलाईन फ्रॉडचा Alert

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशन म्हणजेज IRCTC वर जर तुम्ही तुमचं ऑनलाईन तिकीट बुक करणार असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचं तिकीट असू शकेल खोटं...

    नवी दिल्ली, 29 जानेवारी : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशन म्हणजेज IRCTC वर जर तुम्ही तुमचं तिकीट बुक करणार असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या वेबसाईटवर बुक केलेले ई-तिकीट नकली तर नाही याची खातरजमा करा आणि त्यानंतरच तिकीट बुक करा. IRCTC कडूनच याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेकडे नकली ई-तिकीटांबाबत 2 तक्रारी दाखल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. आयटी सेंटरकडे या तक्रारी पाठवण्यात आल्या असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. कोणत्या नकली वेबसाईटपासून धोका? IRCTCने दिलेल्या माहितीनुसार irctctour.com या नकली वेबसाईटवरुन ही तिकीटं बुक करण्यात आली होती. या वेबसाईटकडून देण्यात आलेलं टूर कन्फर्मेशन व्हाउचर आणि IRCTCचं टूर कन्फर्मेशन व्हाउचर हुबेहुब असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. यावर 9999999999 हा मोबाईल नंबर +91-6371526046 हा लँडलाईन नंबर आणि irctctour2020@gmail.com हा ईमेल आयडी देण्यात आला आहे. वाचा- BUDGET 2020 : 1 फेब्रुवारीनंतर तुमच्या खिशावर होणार थेट परिणामया नकली वेबसाईटवरुन इंडियन रेल्वे टूर, एअर टूर, लँड पॅकेज आणि क्रूज पॅकेज बुक करता येणार असल्याने याची गांभीर्याने दखल घेणं आवश्यक आहे. कारण केवळ 2 नकली ई-तिकीटांच्या तक्रारी पुढे आल्या असल्या तरी आणखी काही प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयटी सेंटरकडे तक्रार पाठवण्यासोबत या प्रकरणाबाबत एफआयरही दाखल करण्यात आली आहे. IRCTCकडून अलर्ट जारी IRCTCने अधिक खबरदारी घेत आपल्या वेबसाईटवर अलर्ट देखील जारी केला आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की irctctour2020@gmail.com ही भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट नाही आहे. वाचा- मुलांच्या अ‍ॅडमिशनसाठी आधार कार्ड गरजेचं, ही कागदपत्रं सादर करून बनवा कार्ड त्याचप्रमाणे या वेबसाईटवरुन करण्यात आलेल्या कोणत्याही व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचं IRCTC कडून स्पष्ट करण्यात आलं आहे यादरम्यान रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून अशाच प्रकारे नकली आणि बेकायदेशीर पद्धतीने तिकीट विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. आरफीएफकडून झारखंडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. एका सॉफ्टवेअरला याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. एकंदरित याप्रकारची फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहकांनी जागरुकतेने व्यवहार करणं गरजेचं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Indian railway, Indian railway app, IRCTC

    पुढील बातम्या