BUDGET 2020 : 1 फेब्रुवारीनंतर तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; होऊ शकतात महत्त्वपूर्ण बदल

BUDGET 2020 : 1 फेब्रुवारीनंतर तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; होऊ शकतात महत्त्वपूर्ण बदल

1 फेब्रुवारी, 2020 रोजी देशाचं बजेट सादर केलं जाणार आहे. त्यामधल्या संभाव्य तरतुदींमुळे खिशावर ताण येईल की फायदा होईल.. वाचा बजेटचे सामान्य माणसावर परिणाम..

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी : 1 फेब्रुवारी, 2020 रोजी देशाचं बजेट सादर केलं जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2020-21 या आर्थिक वर्षाचं बजेट देशासमोर सादर करतील. यावेळी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. बजेटच्या व्यतिरिक्तही अनेक मोठे बदल होणार आहेत.

1 फेब्रुवारीपासून LIC करणार 23 पॉलिसी बंद

31 जानेवारी, 2020 नंतर LIC आपल्या 23 पॉलिसी बंद करणार आहे. नवीन गाईडलाईन्सनुसार नसणाऱ्या विमा योजना बंद करण्याचे निर्देश IRDAIने नोव्हेंबर, 2019च्या अखेरीस विमा कंपनींन्यांना दिले होते. या पॉलिसी मागे घेण्यासाठी याआधी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर, 2019 ही देण्यात आली होती त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. तसंच, सध्या सुरू असलेल्या पॉलिसींमध्ये बदल करण्यासाठी किंवा त्यांच्याकरीता पुन्हा परवानगी घेण्यासाठी 29 फेब्रुवारी, 2020 ही अंतिम तारीख असणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती बदलणार

1 फेब्रुवारीपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होतो. यासोबत एअर टर्बाइन फ्यूल (ATF)च्या किमतीतही बदल होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या किमतीच्या बदलामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवरही परिणाम होतो.

WhatsApp होणार बंद

1 फेब्रुवारीपासून जुने अँड्रॉईड आणि आईओएस ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp सपोर्ट करणार नाही. 1 फेब्रुवारी, 2020 पासून IOS8 आणि त्यापेक्षा जुन्या वर्जनमध्ये WhatsApp चालणार नसल्याची घोषणा WhatsAppने गेल्या वर्षीच केली होती. तर, अँड्रॉईड 2.3.7च्या वर्जनमध्येही WhatsApp चालणार नाही. यामुळं युजर्सना WhatsAppवर नवीन अकाऊंट बनवता येणार नाही. तसेच, सध्याच्या WhatsApp अकाऊंटला वेरिफाईही करता येणार नाही.

आता आगामी बजेट सर्वसामान्यांसाठी काय घेऊन येत आहे, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अन्य बातम्या

बजेट 2020 : मोदी सरकारने PF वरचे व्याजदर केले जाहीर, तुमची होणार बचत

ड्रोनचे शौकिन असाल तर, बातमी वाचाच! ड्रोनचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी उरलेत 2 दिवस

UPSC : कंडक्टरचा कलेक्टर होण्याच्या दिशेनं प्रवास, आता उरलाय एकच स्टॉप!

First published: January 28, 2020, 8:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading