जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ITR News : फक्त आयटीआर भरल्याने येणार नाही रिफंड, यासाठी करा हे सर्वात महत्त्वाचं काम!

ITR News : फक्त आयटीआर भरल्याने येणार नाही रिफंड, यासाठी करा हे सर्वात महत्त्वाचं काम!

इन्कम टॅक्स व्हेरिफिकेशन

इन्कम टॅक्स व्हेरिफिकेशन

ITR Verification : ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. रिटर्न भरल्यानंतर, त्याच्या रिटर्नची जास्तीत जास्त प्रतीक्षा राहते. रिटर्न भरल्यानंतर किती दिवसांनी रिफंड येईल हे कसं कळेल? घ्या समजून

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 जुलै : रिटर्न फाइल केल्यानंतर आपल्या रिफंडचं काय झालं? रिटर्न फाइल केल्यानंतर रिफंड किती दिवसात येईल. हे सर्व प्रश्न नेहमीच टॅक्सपेयरच्या डोक्यात सुरु असतात. आयटीआर फाइल करण्याची अखेरची तारीख 31 जुलै 2023 आहे. रिटर्नची प्रोसेसिंगनंतर टॅक्स डिपार्टमेंटला वाटतं की, आपला क्लेम योग्य असेल तर याची माहिती SMS आणि ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला पाठवली जाते. त्यानंतर रिफंड प्रोसेस सुरु होते.

News18लोकमत
News18लोकमत

पूर्वी आयकर भरणारे आयटीआर ऑनलाइन भरल्यानंतर 120 दिवसांपर्यंत आयटीआर व्हेरिफाय करू शकत होते. पण, गेल्या वर्षी सीबीडीटीने ही वेळ 30 दिवसांनी कमी केली. याचा अर्थ आता ITR भरल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नवीन नियम लागू झाला. सीबीडीटीने यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. Tax Deduction Claim: दान-पुण्य करणाऱ्यांना मिळते टॅक्स सूट! पाहा क्लेम कसं करायचं? अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘फॉर्म ITR-V इलेक्ट्रॉनिक ITR दाखल केल्याच्या 30 दिवसांच्या आत भरावा लागेल. या अवधीनंतर आयटीआर-व्ही दाखल करण्यात आला तर असं समजा की, ज्या रिटर्न संबंधात हा फॉर्म दाखल करण्यात आला आहे. तो कधीच भरला गेलेला नाही. त्यानंतर आयकरदात्याला पुन्हा डेटा (रिटर्न) भरावा लागेल आणि नंतर 30 दिवसांच्या कालावधीत ITR-V दाखल करावा लागेल. व्हेरिफाय केलं नाही तर अमान्य असते ITR आयकर रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेतील शेवटची स्टेप म्हणजे त्याचं व्हेरिफिकेशन करणे. व्हेरिफिकेशन शिवाय आयटीआर अवैध मानले जाईल. अशा परिस्थितीत, तुम्हाला पुन्हा रिटर्न भरावे लागेल आणि त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. तुम्ही व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला आयकर रिटर्न मिळणार नाही. एखादी व्यक्ती नियोजित तारखेपूर्वी त्याच्या आयटीआरचं व्हेरिफिकेशन करण्यात अयशस्वी ठरली, तर ती व्यक्ती विलंबाचे कारण सांगून विभागाला तिच्या आयटीआरचे व्हेरिफिकेशन करण्याची विनंती करू शकतो. ही विनंती मंजूर झाल्यास, तो रिटर्न व्हेरिफाय करू शकतो. ITR Form FY 2022-23: इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये झालेय 6 बदल, तुम्हाला माहितीये का? तुम्ही 6 प्रकारे करु शकता हे काम आयटीआर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे व्हेरिफाय केले जाऊ शकते. ITR व्हेरिफाय करण्याचे एकूण 6 मार्ग आहेत. यापैकी 5 पद्धती ऑनलाइन आणि एक पद्धत ऑफलाइन आहे. रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मिळणारा ओटीपी, बँक अकाउंट, डीमॅट अकाउंट, एटीएम आणि नेटबँकिंगवर आलेल्या ओटीपीच्या मदतीने तुम्ही आयटीआर ऑनलाइन व्हेरिफाय करू शकता. आयटीआर-व्ही फॉर्मची साइन केलेली कॉपी पोस्ट ते इन्कम टॅक्स विभगाला पाठवूनही आयटीआर व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात