ITR Form Changes : आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. याआधी तुम्हाला आयटीआर भरावा लागेल, अन्यथा तुम्हाला दंड भरुन मगच आयकर रिटर्न भरावा लागेल. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही रिटर्न भरू शकता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत आयकर विभागाकडून काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल मोठे नाहीत, पण जर तुम्ही ITR फाइल करणार असाल तर तुम्हाला या बदलांबद्दल माहिती असायला हवी. याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आयकर रिटर्न फॉर्ममध्ये कोणते बदल झाले आहेत ते जाणून घेऊया.
व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ते (VDA) पासून उत्पन्नाचे डिटेल्स 1 एप्रिल 2022 पासून व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेशी संबंधित इन्कमवर टॅक्स लावण्यासाठी आयकर कायद्यात काही स्पेसिफिकेशन जोडण्यात आली आहेत. क्रिप्टोच्या ट्रांझेक्शनवर कलम 194S अंतर्गत TDS लागू होईल. VDA कडून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत आवश्यक खुलासे देण्यासाठी फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. टॅक्सपेयर्सला VDA च्या उत्पन्नाचे संपूर्ण डिटेल्स द्यावे लागतील. Income Tax: ‘या’ लोकांसाठी नाही आयटीआर फॉर्म-1, तुम्ही चुकीचा फॉर्म तर भरत नाहीये ना? जर एखाद्या व्यक्तीला 2022-23 या आर्थिक वर्षात क्रिप्टोकरन्सीमधून कोणतेही उत्पन्न मिळाले असेल, तर त्याला कर भरण्यासाठी खरेदीची तारीख, ट्रान्सफरची तारीख, किंमत आणि विक्रीची रक्कम यांचे डिटेल्स नोंदवावे लागतील. यासोबतच फॉर्म 26AS आणि AIS चे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. 80G कपातीचा दावा करण्यासाठी ARN डिटेल्स जर एखाद्याने 2022-23 या आर्थिक वर्षात दान केलं असेल, तर तो कलम 80G अंतर्गत वजावटीसाठी पात्र आहे. अशा वेळी, देणगीचा एआरएन नंबर आयटीआर फॉर्ममध्ये द्यावा लागेल. जिथे देणग्यांवर 50 टक्के कपात करण्याची परवानगी आहे. Insurance : सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या कठीण काळात कसा येत राहतो पैसा सोर्सवर टॅक्स कलेक्शन टॅक्सपेयर्सला त्यांच्या आयकर दायित्वाच्या विरोधात सोर्स कलेक्शन टॅक्स (TCS)चा दावा करण्याची परवानगी आहे. तसेच, जर एखाद्या टॅक्सपेयरने मागील वर्षांमध्ये कलम 89A अंतर्गत सवलतीचा दावा केला असेल आणि नंतर तो अनिवासी झाला असेल, तर अशा सवलतीतून मिळणाऱ्या करपात्र उत्पन्नाचा तपशील ITR फॉर्ममध्ये आवश्यक आहे. 89A रिलीफ वर उत्पन्नाचे डिटेल्स भारतीय रहिवाशांना परदेशी सेवानिवृत्ती लाभ खात्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर पैसे काढेपर्यंत कर पुढे ढकलण्याचा पर्याय आहे. कलम 89A IT विभागाद्वारे देशात राखून ठेवलेल्या सेवानिवृत्ती लाभ खात्यांमधून उत्पन्नावर कर सवलत प्रदान करते. जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारच्या सवलतीचा दावा केला असेल, तर त्यांना वेतन विभागात डिटेल्स द्यावे लागतील. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराची माहिती 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ITR फॉर्ममध्ये इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. जसे की ITR-3 मधील बॅलेन्स शीटमध्ये एक्स्ट्रा माहिती द्यावी लागेल. यासह, SEBI रजिस्ट्रेशन नंबर शेअर करणे आवश्यक आहे. जेथे करदाता विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII)आहे किंवा SEBI कडे रजिस्टर्ड पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) आहे. इंट्राडे ट्रेडिंगवर डिटेल्स नवीन ITR फॉर्मनुसार, इंट्राडे ट्रेडिंगवरुन टर्नओव्हर आणि उत्पन्नाला नव्याने सुरु केलेल्या सेक्शन ‘ट्रेडिंग अकाउंट’ अंतर्गत पूर्ण माहिती द्यावी लागेल.