नवी दिल्ली, 5 जुलै: टॅक्स रिटर्न भरण्याचं सीझन सुरु आहे. अशा वेळी लोक टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधतात. ज्या लोकांनी नवीन टॅक्स प्रणाली निवडली आहे किंवा निवडणार आहोत त्यांच्यासाठी तर टॅक्स सूट मिळवण्याचे पर्याय नाहीत. मात्र जुनी टॅक्स प्रणाली निवडणारे लोक अनेक प्रकारे टॅक्स वाचवू शकतात. यामधील एक पद्धत म्हणजे दान करणे. सरकार आयकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत विविध धर्मादाय संस्थांना दिलेल्या देणग्यांवर कर कपातीचा दावा करण्याची संधी देते.
मात्र यातही एक नियम आहे. तो म्हणजे आयकर आयुक्तांनी मान्यता दिलेल्या संस्थांना दिलेल्या देणग्यांवरच सूट मिळू शकते. या संस्थांना टॅक्स कमीशनरकडून दान घेणे आणि 80 जी सर्टिफिकेट जारी करण्यासाठी अनुमती प्राप्त असावी. ITR भरण्यासाठी उरले फक्त 27 दिवस! फॉर्मध्ये झालेय हे बदल; अन्यथा एका चुकीमुळे येईल नोटीस कलम 80जी काय आहे कलम 80G अंतर्गत, एक करदाता - वैयक्तिक, कंपन्या किंवा फर्म - काही रिलीफ फंड आणि धर्मादाय संस्थांना दिलेल्या योगदानासाठी आयकर कपातीचा दावा करू शकतात. ज्यांनी नवीन टॅक्स प्रणालीची निवड केली आहे ते या कपातीचा लाभ घेऊ शकत नाहीत. चेक, ड्राफ्ट किंवा रोख रकमेद्वारे केलेले योगदान या वजावटीसाठी पात्र आहे. अन्न, साहित्य, कपडे किंवा औषधांच्या स्वरूपात इतर योगदान कलम 80G अंतर्गत कर कपातीसाठी पात्र नाही. कलम 80G नुसार, दान 50 किंवा 100 टक्के कपातीसाठी पात्र आहेत. कपातीचा दावा कसा करावा कलम 80G अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी, करदात्याला त्याच्या देणगीचे डिटेल्स ITR फॉर्ममध्ये ‘शेड्यूल 80G’ मध्ये द्यावे लागतील. टॅक्समनचे उपमहाव्यवस्थापक नवीन वाधवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळापत्रकात चार टेबल आहेत. तक्ता A, B, C आणि D. तुम्ही दिलेली देणगी माहिती अचूक असल्याची खात्री करा. Income Tax: ‘या’ लोकांसाठी नाही आयटीआर फॉर्म-1, तुम्ही चुकीचा फॉर्म तर भरत नाहीये ना? काय माहिती द्यावी लागेल? -प्राप्तकर्त्याचे नाव आणि पत्ता -प्राप्तकर्त्याचा पॅन -देणगीची एकूण रक्कम – रोख स्वरूपात आणि इतर मार्गांनी भरलेल्या रकमेचा ब्रेकअपसह देणगीची पात्र रक्कम म्हणजे वजावटीसाठी पात्र असलेली रक्कम