मुंबई, 12 जुलै : जुलै महिना हा महत्त्वाचा महिना आहे. कारण या महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असतं. कारण रिटर्न भरायची शेवटची तारीख सध्या तरी 31 जुलै आहे. हिंदू एकत्र कुटुंब आणि ज्यांच्या खात्यांसाठी ऑडिटिंगची गरज नाही, ज्यांची मिळकत 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी रिटर्न भरायची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
तुम्ही 31 जुलैनंतर 31 डिसेंबर 2019पर्यंत IT फाइल केलात तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही 1 जानेवारी 2020पासून 30 मार्च 2020पर्यंत रिटर्न भरलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.
मुंबई उच्च न्यायालयात 71 जागांवर भरती, 'या' उमेदवारांना मिळेल पसंती
यावेळी तुम्ही फक्त आधार कार्डद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. तसं केलं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच तुम्हाला पॅन कार्ड देईल.
यावेळच्या बजेटमध्ये Incom Taxमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबतची घोषणा केली. मोदी सरकार Income Tax Slab कमी करून 3 लाखापर्यंत टॅक्स सूट देणार अशी चर्चा रंगली होती. पण, प्रत्यक्षात मात्र 5 लाख रूपयापर्यंत कर सूट देण्यात आली आहे.
महाराष्ट्राला पावसाने झोडपलं,जगबुडी नदीला पूर आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
पाच वर्षात वाढले करदाते
महत्त्वाची बाब म्हणजे 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळात करामध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण, मागील 5 वर्षामध्ये 6.38 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंत करात वाढ झाली आहे. मागील पाच वर्षामध्ये करामध्ये 78 टक्के वाढ झाली असल्याची माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
'चौथ्या क्रमांकावर 'हा' मुंबईकर खेळाडूच होता योग्य, निवड समितीचा निर्णय चुकला'!
देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यावर मोदी सरकार आता भर देताना दिसत आहे. याची प्रचिती अर्थसंकल्पामध्ये दिसत असून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. आपल्या भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी पुढील पाच वर्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत