महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपलं, जगबुडी नदीला पूर आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

जगबुडी नदीनं 7 मीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. दरम्यान, कोल्हापूरदेखील पावसाचा जोर कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 10:21 AM IST

महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपलं, जगबुडी नदीला पूर आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

मुंबई, 12 जुलै : जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प झाला आहे. खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून वाहतूक थांबवण्यात आली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून वाहतूक थांबवण्यात आली असून जगबुडी पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांनी आणि धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

जगबुडी नदीनं 7 मीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. दरम्यान, कोल्हापूरदेखील पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापुरामध्ये मुसळधार पावसामुळे 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड, गगनबावडामध्ये मुसळधार पाऊस आहे. रात्री कोल्हापूर गगनबावडा मार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोकणातही वैभववाडीला जाणारा मार्ग सुरक्षेसाठी बंद करण्यात येणार आहे. सध्या रस्त्यावर अर्धा फूट पाणी साचलं आहे. राधानगरी धरण 62 टक्के भरलं आहे. त्यामउळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर आली आहे.

आंबा, दाजीपूर भागात दिवसभर मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे अनेक घरांत पाणी गेलं आहे. रस्त्यांवर पाणी असल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर शहरातही पावसाची संततधार कायम असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

खेड - रत्नागिरीमध्ये गेल्या 5 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आला आहे. तर खेड-दापोली मार्गावर खेडमधील एकविरा नगर येथे रस्त्यावर 5 फूट पाणी साचल्याने मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. अनेक अंतर्गत मार्ग बंद करण्यात आले आहेत.

Loading...

खेड-सुसेरी मार्गावर 7 ते 8 फूट पाणी साचलं आहे. त्यामुळे खेडमधील खाडीपट्याचा संपर्क तुटला आहे. जवळपास खाडीपट्यातील 15 गावांचा संपर्क तुटला आहे. नारंगी आणि जगबुडी नद्यांना पूर आल्याने उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली मंडणगड या तीन तालुक्यातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मुसळधार पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 24 तासांमध्ये तलावातील पाणीसाठ्यात लक्षणिय वाढ झाली आहे. मात्र,  गेल्यावर्षीपेक्षा पाणीसाठा अडीच टक्क्यांनी कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी आहे.

VIDEO विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...