World Cup : 'चौथ्या क्रमांकावर 'हा' मुंबईकर खेळाडूच होता योग्य, निवड समितीचा निर्णय चुकला'!

World Cup : 'चौथ्या क्रमांकावर 'हा' मुंबईकर खेळाडूच होता योग्य, निवड समितीचा निर्णय चुकला'!

चौथ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत बेजाबाबदारपणे शॉट खेळून बाद झाला, त्यानंतर त्याच्यावर टिका करण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं सेमीफायनलमध्ये खराब फलंदाजी केली. त्यामुळं भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि न्यूझीलंडनं फायनलमध्ये प्रवेश केला. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात केवळ 24 धावांत भारताचे चार फलंदाज बाद झाले होते. आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर मधल्या फळीलाही चांगली फलंदाजी करता आली नाही. चौथ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत चांगली फलंदाजी करत असतानाच बेजाबाबदारपणे शॉट खेळून बाद झाला. त्यामुळं भारताची खेळी डगमगली. त्यामुळं वर्ल्ड कपमधली भारताचा चौथ्या क्रमांकाची चिंता पुन्हा एकदा समोर आली.

दरम्यान आता बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत, या सगळ्याचे खापर निवड समितीवर फोडले आहे. जगदाळे यांनी, वर्ल्ड कपसाठी संघाची निवडच चुकली असा आरोप केला आहे. त्यांच्या मते, "भारतीय संघाची मधली फळी, दबावाखाली खेळण्यासाठी योग्य नव्हती, त्यामुळं ही जागा अजिंक्य रहाणे हाच योग्य उमेदवार आहे". जगदाळे यांनी निवड समितीवर ताशेरे ओडत, "ज्या खेळाडूंना संघात स्थान टिकवता आले नाही, त्यांना संघात जागा का देतात. त्यामुळं रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूला संघात स्थान द्यायला हवे होते", असे मत व्यक्त केले.

ऋषभ पंतला आधीपासून संघात स्थान का नव्हते

वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंतला सुरुवातीपासून भारतीय संघात जागा न देण्याबाबतही जगदाळे यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, "इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभनं कसोटी क्रिकेटमध्ये शतक केले होते. मग संघात विजय शंकरला का स्थान दिले", असा सवालही त्यांनी निवड समितीला विचारला.

शास्त्रींनी सांगितले पराभवाचे कारण

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी, "चौथे स्थान हे आमच्यासाठी या वर्ल्ड कपमध्ये चिंतेचा विषय राहिला आहे. सुरुवातीला केएल राहुलला या स्थानावर संधी दिली होती. मात्र, शिखर धवन जखमी झाल्यानंतर राहुलला सलामीसाठी उतरवण्यात आले. त्यानंतर विजय शंकरही जखमी झाला. त्यामुळं चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आमच्यासमोर कायम होता". त्यामुळं आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर भारताला मधली फळी सावरू शकली नाही. अखेर जडेजा आणि धोनीनं भारताची बाजू सावरली. दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. मात्र जडेजा आणि धोनी भारताचा पराभव रोखू शकले नाही.

वाचा- IPLचा 'हा' नियम वर्ल्ड कपमध्ये का नाही? विराटचा ICCला सवाल

वाचा- World Cup : विराट नाही तर वर्ल्ड कपनंतर रोहितकडे असणार कर्णधारपद?

वाचा- World Cup : हिटमॅनची एक धाव, फायनलमध्ये दोन फलंदाजांना शतकाची गरज!

SPECIAL REPORT : धोनी भावूक झाला आणि चाहत्यांचा बांध फुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 10:46 AM IST

ताज्या बातम्या