आयकर विभागाकडून नवीन अलर्ट! 31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक करण्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

आयकर विभागाकडून नवीन अलर्ट! 31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक करण्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

पॅन आणि आधार कार्ड जोडण्यासाठी आयकर विभागारडून नवीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. पॅन आणि आधार कार्ड जर तुम्ही 31 मार्चपर्यंत लिंक केलं नाही, तर तुमचं PAN रद्द होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मार्च :  केंद्र सरकारने पॅन कार्ड (PAN Card) आधार (Aadhaar Card) बरोबर जोडणं अनिवार्य केलं आहे. त्याचप्रकारे पॅन आणि आधार कार्ड जोडण्यासाठी आयकर विभागारडून नवीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. पॅन कार्ड आधार सोबत जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून अशा नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, 31 मार्चपर्यंत जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Aadhaar Link Mandatory) नाही केलं,  तर पॅन कार्ड संबंधित सर्व काम थांबवण्यात येतील आणि पॅन कार्डदेखील रद्द करण्यात येईल. आयकर विभागाने दिलेल्या या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे की, तुम्ही Biometric Aadhaar authentication च्या माध्यमातून किंवा NSDL आणि UTITSL च्या केंद्रांवर जाऊन पॅन-आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

(हे वाचा- अलर्ट! पुढील आठवड्यात बँका 4 दिवस बंद, कर्मचारी संघटनांचा संपाचा इशारा)

याआधीही आधार-पॅन लिंक करण्याची तारीख (PAN Aadhaar Link Deadline) अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख  31 मार्च आहे, ज्यानंतर तुमचं पॅन कार्ड अन-ऑपरेटिव्ह होईल. अनेकांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे लिंकिंगसाठीची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली होती.  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने 31 मार्च 2020 पर्यंत ही मुदत वाढवली आहे. याआधी ही मुदत 31 डिसेंबर 2019 ला संपणार होती. आतापर्यंत 8 वेळा आधार-पॅन लिंकिंगची मुदत वाढवली आहे. 1 एप्रिलपासून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे.

(हे वाचा- कोरोनाच्या धोक्यामुळे RBI चं आवाहन, आजपासूनच वापरा डिजिटल पेमेंट पद्धती अन्यथा..)

तुम्ही जर 31 मार्चपर्यंत आधार-पॅन लिंक केलं नाही तर तर तुमचं पॅन कार्ड रद्द होणार आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चनंतर सुद्धा तुमचं पॅन कार्ड आधारसोबत जोडता येईल, मात्र जोपर्यंत तुम्ही लिंकिगची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचं पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय राहील.

आधार-पॅन लिंकिंग कसं कराल?

-आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.

-तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.

-तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.

(हे वाचा- Coronavirus मुळे ऑनलाइन खरेदीमध्ये वाढ, अ‍ॅमेझॉन देणार 1 लाख जणांना नोकऱ्या)

-'View Link Aadhaar Status'  वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल

-याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.

-UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

First published: March 21, 2020, 3:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading