कोरोनाच्या धोक्यामुळे RBI चं आवाहन, आजपासूनच वापरा डिजिटल पेमेंट पद्धती अन्यथा...

कोरोनाच्या धोक्यामुळे RBI चं आवाहन, आजपासूनच वापरा डिजिटल पेमेंट पद्धती अन्यथा...

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान मांडलं आहे. चीनमधील वुहान शहरातून आलेला कोरोना आता भारतात पोहोचला आहे. याच पार्श्वभूमिवर आरबीआयने डिजिटल पेमेंट जास्तीत जास्त वापरण्याचं आवाहन केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च: कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान मांडलं आहे. चीनमधील वुहान शहरातून आलेला कोरोना आता भारतात पोहोचला आहे. भारतामधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितिनुसार भारतामध्ये रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील पहिला मृत्यू आज सकाळी कस्तुरबा रुग्णालयामध्ये झाला.

एकंदरित संपूर्ण परिस्थिती पाहता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारतातील नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी एखादं पेमेंट करताना जास्तीत जास्त डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा. कोरोना व्हायरस पसरणं थांबवण्यासाठी डिजिटल पेमेंट पद्धती वापरणं आवश्यक असल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.

(हे वाचा-खूशखबर! YES बँकेवरील निर्बंध या दिवशी हटवणार, ग्राहकांनी सोडला सुटकेचा निःश्वास)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी अशी माहिती दिली आहे की, NEFT, IMPS, UPI आणि BBPS फंड ट्रान्सफर यांसारख्या पर्यायांचा वापर करून आवश्यक वस्तूंची खरेदी-विक्री करणं शक्य आहे. या सुविधा 24 तास उपलब्ध आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता विळखा लक्षात घेता आरबीआयने हे पाऊल उचललं आहे.

का कराल मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, UPI चा वापर करा

आरबीआयने सांगितलं आहे की, तुमच्या सोयीसाठी मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा पेमेंट पद्धतींचा वापर करा. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीचे पेमेंट करण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असं आवाहन देखील आरबीआयकडून करण्यात आले आहे.

(हे वाचा-कोरोनाचं संकट वाढतंय!तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून यासाठी मेडिक्लेम मिळणार?)

आरबीआयने त्यांच्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की, सोशल कॉन्टॅक्ट (Social contact) टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट एक पर्याय आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार एखाद्या संक्रमित पृष्ठभागाला तुम्ही हात लावला आणि तोच हात चेहरा, नाक किंवा डोळ्यांना लावला तर विषाणू पसरण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे अशाप्रकारे संक्रमण टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

राज्यात जमावबंदी

देशभरामध्ये अनेक राज्यात गर्दीची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातही सर्वच जिल्ह्यांध्ये आणि शहरांध्ये खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई, गोवा, पुण्यानंतर आता नागपूर आणि वर्धामध्येही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे. आजपासून 31 मार्चपर्यंत हा कायदा लागू करण्यात आला असल्याचे आदेश सह-पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिले आहेत. अनेक शहरांमध्ये मॉल्स, सिनेमागृह, चित्रपटगृह त्याचप्रमाणे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2020 01:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading