मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Coronavirus मुळे ऑनलाइन खरेदीमध्ये वाढ, अ‍ॅमेझॉन देणार 1 लाख जणांना नोकऱ्या

Coronavirus मुळे ऑनलाइन खरेदीमध्ये वाढ, अ‍ॅमेझॉन देणार 1 लाख जणांना नोकऱ्या

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांना ऑनलाइन सर्व्हिसेसचा वापर करावा लागत आहे. अशावेळी अ‍ॅमेझॉनने एक नवीन योजना आणली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 17 मार्च : कोरोना व्हायरसमुळे अनेकांना घरी बंद राहावं लागत आहे. अनेकांच्या नोकरी व्यवसायावर गदा आली आहे. जगभरात आतापर्यंत 7000 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 2 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे 127 रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

(हे वाचा-कोरोनाच्या धोक्यामुळे RBI चं आवाहन, आजपासूनच वापरा डिजिटल पेमेंट पद्धती अन्यथा..)

कोरोनामुळे अनेकांचे नोकरी-व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या देशातील सरकारने घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांना ऑनलाइन सर्व्हिसेसचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता अ‍ॅमेझॉनने 1 लाख लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे.  Amazon ने सांगितलं आहे की, त्यांच्याकडे अमेरिकेतील अनेक ऑर्डर पेंडिंग आहेत. या पूर्ण करण्यासाठी त्यांना माणसांची गरज आहे. त्यासाठी त्यांनी 1 लाख लोकांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने काम देण्यात आलेले कर्मचारी वेअर हाऊस आणि डिलिव्हरीचं काम पाहतील.

(हे वाचा-कोरोनाचं संकट वाढतंय!तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून यासाठी मेडिक्लेम मिळणार?)

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे नागरिक बाहेक जाणं टाळत आहेत. हेच कारण आहे की लोकं मुलभूत गरजा भागवण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइट्सचा सहारा घेत आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त ऑर्डर लोकांकडून येत आहेत. त्यांचा पुरवठा करण्यासाठी अ‍ॅमेझॉनला लोकांची गरज आहे. Amazonच्या माहितीनुसार या कर्मचाऱ्यांना 2 डॉलर ते 15 डॉलर प्रति तास इतका पगार देण्यात येणार आहे.  अ‍ॅमेझॉनव्यतिरिक्त अमेरिकेतील सुपर मार्केट Kroger आणि Raley’s यांनाही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी स्टाफची गरज आहे.

First published: