नवी दिल्ली: अवघ्या दोन महिन्यांच्या काळानंतर 2022-23 हे आर्थिक वर्ष संपेल. यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. करदात्यांना कर वाचवण्यासाठी आपल्या सर्व गुंतवणुकीबद्दल माहिती द्यावी लागेल. आर्थिक वर्ष संपत आल्यानं करदात्यांनी कर वाचवण्यासाठी गुंतवणूकही वाढवली आहे. मात्र, अशा परिस्थितीत गुंतवणूकदार अनेकदा चुकीचे निर्णय घेतात. घाईघाईनं केलेली गुंतवणूक करदात्यासाठी अडचणी निर्माण करू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. करतज्ज्ञ गौरी चढ्ढा सांगतात की, अनेकदा गुंतवणूकदार घाईघाईनं एखाद्या योजनेत आता 50 हजार रुपये गुंतवतो. पण, पुढील अनेक वर्षे त्याला ही गुंतवणूक करावी लागेल याकडे तो लक्ष देत नाही. गौरी सांगतात की, करदात्यांनी घाईत गुंतवणूक करून कर वाचवण्याचा कधीही प्रयत्न करू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजनेचा कालावधी किती आहे आणि ते इतके दिवस त्यांचे पैसे गुंतवूण ठेवण्यास तयार आहेत का, याची माहिती अगोदर घेतली पाहिजे. कारण, ज्या गुंतवणुकीच्या पर्यायांवर 80C अंतर्गत कर सवलत उपलब्ध आहे त्यांचा मॅच्युरिटी कालावधी 10 ते 15 वर्षे असतो. बजेट 2023 मध्ये मध्यमवर्गीयांना मिळू शकतो दिलासा, निर्मला सीतारामण म्हणाल्या… टार्गेट निश्चित करावं करदात्यांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या टारगेटचा विचार केला पाहिजे. त्यांना फक्त कर वाचवायचा आहे की, कर वाचवण्याबरोबरच चांगले रिटर्न्ससुद्धा मिळवायचे आहेत, याबाबत विचार केला पाहिजे. अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे तुमचा कर वाचतो पण, त्यातून फार चांगले रिटर्न्स मिळत नाहीत. बँक एफडी हे याचं उत्तम उदाहरण आहे. बँक एफडी गुंतवणुकीचा अतिशय सुरक्षित पर्याय आहे. मात्र, त्यावर फार जास्त रिटर्न्स मिळत नाहीत. सध्या रेपो दरात वाढ झाल्यानं बँकांनी एफडीमधील रिटर्न्समध्येही वाढ केली आहे. टॅक्स सेव्हर एफडीमध्ये, एका मर्यादेनंतर व्याजावरदेखील टॅक्स भरावा लागतो. जर तुमचं टारगेट संपत्ती निर्माण करण्याचं असेल तर तुम्ही अशा योजनांमध्ये गुंतवणूक करावी ज्यातून चांगले रिटर्न्स मिळतील.
बजेट शब्द नक्की कुठून आला? नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का?काय आहेत गुंतवणुकीचे पर्याय ईएलएसएस, एनपीएस, यूलिप, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससी हे अतिशय आकर्षक गुंतवणूक पर्याय आहेत. येथे तुम्हाला करबचतीसोबतच चांगले रिटर्न्सदेखील मिळतात. ईएलएसएसचा मॅच्युरिटी कालावधी फक्त तीन वर्षांचा आहे. त्यामुळे यात तुमचे पैसे फार काळ अडकत नाहीत.
Union Budget 2023: कधी आणि कुठे होणार बजेट, घरबसल्या LIVE कसं पाहता येईल?मात्र, यातून मिळणारे रिटर्न्स निश्चित नसतात. टॅक्स सेव्हिंग, रिटर्न आणि पेन्शन फंडाच्यादृष्टीनं पाहिले तर राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) ही सर्वोत्तम गुंतवणूक योजना आहे. या योजनेत निवृत्तीपर्यंत गुंतवणूक करावी लागते. या योजनेतील गुंतवणूक आणि रिटर्न दोन्ही करमुक्त आहेत. यामध्ये तुम्हाला नऊ ते 12 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतो. या योजनेतून व्यक्ती कोट्यधीश बनू शकते.