जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Union Budget 2023: कधी आणि कुठे होणार बजेट, घरबसल्या LIVE कसं पाहता येईल?

Union Budget 2023: कधी आणि कुठे होणार बजेट, घरबसल्या LIVE कसं पाहता येईल?

Budget 2023 live

Budget 2023 live

Union Budget 2023: बजेटचा तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम? देशासाठी का महत्त्वाचं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-2023 सादर करणार आहेत. सर्व उद्योग, व्यावसायिक, करदाते, तज्ज्ञ आदी विविध माध्यमातून अर्थसंकल्पाकडून आपल्या अपेक्षा अर्थमंत्र्यांकडे पाठवत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार आपला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 विशेष महत्त्व आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या दुसऱ्या दिवशी हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 31 जानेवारीला अर्थमंत्री आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल.

Budget 2023 : केंद्र सरकारची कमाई कशी होते? बजेटमधून समजेल सर्व गणित

मी बजेट कुठे बघू शकतो? जर तुम्हाला बजेटची घोषणा ऑनलाइन पाहायची असेल तर तुम्ही पीआयबी आणि संसद टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ती पाहू शकता. दूरदर्शन आणि संसद टीव्हीवर तुम्ही केंद्रीय बजेट टीव्हीवर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय बजेटचे सगळे अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहायला मिळणार आहेत.

Budget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पात मिळेल का करसवलत? सर्वसामान्यांच्या काय आहेत अपेक्षा?

याशिवाय मनीकंट्रोल आपल्या वाचकांसाठी बजेट लाइव्ह स्ट्रीमिंगपासून बजेटमधील महत्त्वाचे हायलाइट्स पाहता येणार आहे. या व्यतिरिक्त सीएनबीसी टीव्ही 18 आणि सीएनबीसी आवाजवर देखील तुम्हाला याचे सर्व अपडेट्स पाहायला मिळणार आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना मिळणार मोठा दिलासा? सर्वसाधारण अर्थसंकल्पाबाबत सामान्यांच्या आणि करदात्यांच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या असतात. अर्थसंकल्प येणे बाकी आहे, मात्र त्यापूर्वीच ज्येष्ठ करदात्यांना खूश करण्यात आले आहे. आता काही करदात्यांना आयटीआर फायलिंग भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात येत आहे. 75 वर्षांवरील ज्यांचे उत्पन्नाचे साधन केवळ पेन्शन आणि बँकांकडून मिळणारे व्याज आहे, अशा नागरिकांना आयटी रिटर्नची आवश्यकता नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात