मुंबई, 18 जानेवारी: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट करून पॅनकार्डधारकांना पुन्हा एकदा सतर्क केले आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. असे न केल्यास, 1 एप्रिल 2023 रोजी पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. तुम्ही ते वापरू शकणार नाही. देशातील बहुतांश पॅनधारकांनी असे केले आहे. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांनी अद्याप आपला पॅन आधारशी लिंक केलेला नाही. त्यांच्यासाठी वारंवार इशारा दिला जात आहे. जर तुम्ही देखील पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आयकर कायदा, 1961 नुसार, 31 मार्च 2023 पूर्वी सर्व पॅन धारकांसाठी जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत त्यांनी त्यांचा पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जे पॅन आधारशी लिंक नाहीत ते 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होतील. महत्वाची सूचना. उशीर, आजच लिंक करा!'
जर तुम्ही पॅनला आधारशी लिंक केले नाही तर आता तुम्हाला रिटर्न भरता येणार नाही. तसेच 31 मार्चपर्यंत फिजिकल शेअर्सचे डीमॅट स्वरूपात रूपांतर करणे देखील आवश्यक आहे. पॅन कार्डचा वापर आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी केला जातो. या क्रमांकावरून सरकार लोकांच्या कराची माहिती ठेवते. आयकर विभाग आर्थिक व्यवहारांच्या नोंदीही ठेवतो. हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक सिस्टिम अंतर्गत केले जाते. देशातील कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीची माहिती एकाच पॅन क्रमांकावर नोंदवली जाते. अशा परिस्थितीत एखाद्याने दोन किंवा त्याहून अधिक पॅन कार्ड बनवले असले तरी त्याला सहजासहजी पकडता येत नव्हते. याच कारणामुळे सरकार आता पॅनला आधारशी लिंक करत आहे. फक्त एक पॅन कार्ड आधारशी लिंक करता येईल. अशा परिस्थितीत जर कोणाकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर ते आपोआप निष्क्रिय होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Pan Card, Pan card online